सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच मिळणार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 19:23 IST2021-06-30T19:22:26+5:302021-06-30T19:23:04+5:30
लवकरच दिला जाणार सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता. शासनाकडून अधिसूचना जारी.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच मिळणार सातव्या वेतन आयोगाची थकबाकी
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी कर्मचाऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे. निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुलै महिन्याच्या वेतनासोबत दिली जाईल. तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकीचा दुसरा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत दिला जाईल. जिल्हा परिषद, अनुदानित शाळा आणि अन्य अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची थकबाकीची रक्कम सप्टेंबर महिन्यात मिळणाऱ्या पगारासोबत देण्यात येणार आहे.
भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनच्या खात्यात जमा करण्यात यावी, तसंच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीन अदा करण्यात येणार आहे. १ जून २०२० ते शासन आदेशाच्या दिनांकापर्यं जे सेवानिवृत्त झाले असतील किंवा ज्यांचा मृत्यू झाला असेल अशांना वेतनाच्या थकबाकीची रक्कम रोखीनं अदा करण्यात येणार आहे.
भविष्य निर्वाह निधी योजना खात्यात जमा करण्यात आलेली दुसऱ्या हप्त्याची रक्कम १ जुलै २०२० पासून दोन वर्षे म्हणजे ३० जून २०२२ पर्यंत काढता येणार नाही, असंही शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२१ रोजी देणे असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता स्थगित ठेवण्यात येत आहे. थकबाकीचा तिसरा हप्ता देण्यासंदर्भात स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील.