शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘लॉकडाऊन’मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या घटल्या; पश्चिम विदर्भाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 4:46 PM

दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न यासारख्या अनेक विवंचणेमुळे विदर्भातील शेतकरी मृत्यूचा फास जवळ करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

गजानन मोहोडअमरावती : ‘लॉकडाऊन’च्या काळात मार्च ते जून या महिन्यात पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रकरणात गतवर्षीच्या तुलनेत ५५ ने कमी आलेली आहे. हा दिलासा मानला जात आहे. लॉकडाऊनपूर्वीच्या काळात शासनाने कर्जमुक्तीसह अनेक प्रकारे शेतकऱ्यांना मदत दिली. त्यामुळे शेतकरी सावरायला मदत झाल्याचा प्रशासनाचा सूर आहे. 

लॉकडाऊनच्या काळात शेतकरी आत्महत्या कमी झाल्यात, ही सकारात्मक बाब आहे. वास्तविकत: या काळात अडचणी वाढल्या होत्या. याच्या खोलात जाऊन कारणांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल मागविणार असल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी सांगितले. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण व लग्न यासारख्या अनेक विवंचणेमुळे विदर्भातील शेतकरी मृत्यूचा फास जवळ करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. पश्चिम विदर्भात अलीकडच्या काळापर्यंत दर सहा ते आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे शासनाच्या अहवालावरून स्पष्ट होते. यंदा जानेवारी जून या सहा महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह नागपूर विभागातील वर्धा अशा सहा शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यात ४७१ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. मार्च ते जून असे चार महिने ‘लॉकडाऊन’चे  गृहीत धरता या कालावधीत २७१ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. मागील वर्षी या चार महिण्यात ३२६ शेतकºयांच्या झाल्या होत्या.

पश्चिम विदर्भात १ जानेवारी २००१ पासून १ जून २०२० पर्यत १७ हजार ५०८ शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ८ हजार १ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली ९ हजार २२९ अपात्र ठरलेली आहेत. अद्यापही २७८ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल आहे.

शेतकरी आत्महत्यांची स्थिती महिना        २०२०    २०१९मार्च        ६०    ८२एप्रिल        ५१    ७१मे        १०८    ९२जून        ५२    ८२एकूण         २७१    ३२६

शेतकरी आत्महत्यांमध्ये आलेली हा निश्चित दिलासा आहे. मात्र, यामागे लॉकडाऊनचे कारण नाही तर त्यापूर्वी शासनाची कर्जमुक्ती योजना, पिकांचे नुकसानीसाठी देण्यात आलेली मदत व विविध योजनांद्वारे शेतकºयांना मदत देखील महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल मागविला आहे. - पीयूष सिंग, विभागीय आयुक्त, अमरावती या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये कमी आली असली तरी शेतकºयांवरील संकट निस्तरलेले नाही. सद्यस्थितीत दुबार पेरणी ओढावलेली आहे. शेतकºयांचा कापूस घरी पडून आहे. नाफेडचे चुकारे झालेले नाही, पीककर्ज वाटपाचा त्रागा कायम आहे.- किशोर तिवारी,अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या