'मुंबई महापालिकेत नोकरी लावून देतो', मुंबई, सातारा, कोल्हापूरच्या तब्बल ४३ जणांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 10:18 IST2026-02-23T10:16:33+5:302026-02-23T10:18:21+5:30

BMC Job Fraud: मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन देऊन अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी ३३ लाखांचा गंडा घातला असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

'Gives me a job in Mumbai Municipal Corporation', 43 people from Mumbai, Satara, Kolhapur cheated | 'मुंबई महापालिकेत नोकरी लावून देतो', मुंबई, सातारा, कोल्हापूरच्या तब्बल ४३ जणांची फसवणूक

'मुंबई महापालिकेत नोकरी लावून देतो', मुंबई, सातारा, कोल्हापूरच्या तब्बल ४३ जणांची फसवणूक

मुंबई : मुंबई महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सांगलीतील ५० वर्षीय शेतकऱ्यासह पालिका नोकरीसाठी मुंबईसह सांगली, सातारा, कोल्हापूरमधील ४३ जणांची ३३ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता असून याप्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीतील रहिवासी असलेले अनिलकुमार गाँजारी (५०) यांच्या तक्रारीनुसार, ते शेतीचा व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांची ओळख माया चव्हाण (५९) हिच्याशी जून २०२४ मध्ये नातेवाइकांमार्फत झाली. संबंधित महिला पालिका (एल. वॉर्ड, कुर्ला) येथे कार्यरत असल्याचे सांगत होती. तिने पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा दावा करत विविध पदांसाठी नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.

तक्रारीनुसार, शिपाई, लिपिक, आर. ए. लिपिक व हेड क्लार्क पदांसाठी १.७० लाख ते २.५० लाख रुपये घेण्यात येतील, असे सांगण्यात आले. सुरुवातीला फॉर्म फीच्या नावाखाली रक्कम घेतल्यानंतर उमेदवारांकडून कागदपत्रे मागविण्यात आली. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घाटकोपर पूर्व येथील पारेख हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराकडून १० हजार रुपये रोख स्वरूपात घेण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने सांगितले की, ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान विविध बँक खात्यांवर ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे २४ लाख ६८ हजार पाठविण्यात आले. तसेच मुंबईत प्रत्यक्ष भेटीदरम्यान ८ लाख ३० हजार रुपये रोख दिले.

संबंधित महिला पालिकेत शिपाई पदावर

संबंधित महिला प्रत्यक्षात महानगरपालिकेत केवळ शिपाई पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. इतर आरोपींनीही बनावट ओळखपत्रे व शिक्के वापरून स्वतःला अधिकारी म्हणून भासविल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात प्रथमेश चव्हाण, सुरेंद्र गुरव, राहुल जाधव (स्वतःला बीएमसी अभियंता म्हणवणारे) व इतरांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे ४३ उमेदवारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे विश्वास जिंकला

संबंधित आरोपींनी स्टॅम्प पेपरवर रक्कम परत करण्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. मात्र मुदतीनंतरही पैसे परत न दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. कुर्ला पोलिस ठाण्याकडून प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. 

यामध्ये बनावट कागदपत्राद्वारे विश्वास संपादन करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. तसेच चव्हाण ही महिला सेवानिवृत्त झाली असल्याची माहितीही तक्रारदार यांना मिळाली. पोलिस सखोल तपास करीत आहेत.

Web Title : मुंबई नौकरी घोटाला: 43 लोग ₹33 लाख से ठगे गए

Web Summary : मुंबई में नौकरी के नाम पर सांगली, सतारा और कोल्हापुर के 43 लोगों से ₹33 लाख की ठगी। एक महिला ने बीएमसी में नौकरी दिलाने का वादा करके क्लर्क और चपरासी जैसे पदों के लिए पैसे लिए, नकली दस्तावेजों और मेडिकल जांच का इस्तेमाल किया। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Mumbai Job Racket: 43 Duped of ₹3.3 Million

Web Summary : A Mumbai job scam duped 43 people from Sangli, Satara, and Kolhapur of ₹3.3 million with promises of BMC jobs. A woman, posing as a BMC employee, allegedly took money for positions like clerk and peon, using fake documents and medical exams to gain trust. Police are investigating the fraud.