शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याची दिशा घडवण्यासाठी व्हा सारे सज्ज!

By admin | Updated: January 8, 2017 01:22 IST

आजकाल करिअरचे विविध पर्याय आपल्याला उपलब्ध झाले आहेत. त्यात स्वत:चा निभाव लागण्यासाठी आपण ते करिअर करण्यास सक्षम आहोत का, हेही तपासून पाहिले जात आहे.

- डॉ. शिवांगी झरकर

आजकाल करिअरचे विविध पर्याय आपल्याला उपलब्ध झाले आहेत. त्यात स्वत:चा निभाव लागण्यासाठी आपण ते करिअर करण्यास सक्षम आहोत का, हेही तपासून पाहिले जात आहे. थोडक्यात, वेगवेगळ््या मार्गाने तुमचं करिअर हे बहरू शकतं. मात्र, ते बहरण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. हेच मार्गदर्शन दर आठवड्याला शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञ करतील ‘बहुदिशा’ या सदरातून...

करिअर म्हणजे नक्की काय?
करिअर म्हणजे, तुमच्या आयुष्याची दिशा आणि जीवन जगण्याची आशा. आजच्या जगात करिअर नसेल, तर तुमचे व्यक्तिमत्त्व एका विनाइंजिनाच्या गाडीप्रमाणे असते की, जी पुढेही जाऊ शकत नाही.... ना चालू शकत. त्याचप्रमाणे, करिअर ही ऊर्जा आहे, जी तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला वेग देते. काहींसाठी करिअर म्हणजे, आयुष्याला मिळालेली एक आगळीवेगळी कलाटणी असते की, जी तुमचे प्रारब्ध बदलून टाकते. तुमच्यासाठी कधी-कधी करिअर संधीचा दरवाजा खटखटवते. जेणेकरून, पुढचे आयुष्य सुखकारक होऊन जाते, परंतु प्रत्येकाच्या जीवनात करिअरच्या संधी सरळ मार्गाने आणि सोप्या पद्धतीने मिळतात असे नाही, तर कधी-कधी करिअर एक वादळ बनून येते. या वादळात तुम्ही बऱ्याच गोष्टी गमवू शकता, पण जेव्हा थंड डोक्याने विचार कराल, तेव्हा लक्षात येईल की, प्रत्येक संकट तुम्हाला करिअरची नवीन संधी मिळवून देते.

करिअर निवडण्याआधीची
पार्श्वभूमी
करिअर निवडण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. करिअर निवडण्याचे मार्ग जितके महत्त्वाचे, तितकेच करिअर निवडण्याआधीची पार्श्वभूमी जाणणे आणि माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. उदा. जर एखाद्या पिकाची लागवड करायची असेल, तर मातीचे/भूमीचे परीक्षण आधी करणे अनिवार्य असते. त्याचप्रमाणे, करिअर निवडायचे असेल, तर मार्केटमधील साधने वापरण्याआधी स्वत:चे, करिअरचे परीक्षण करणे आवश्यक असते. एक उदाहरण देते कोकणातील जमिनीबाबत. कोकणात आंबासुद्धा येतो आणि नारळही व दोन्ही फळांचे महत्त्व वेगवेगळे आहे. आता जर तुम्ही आंब्याचे कलम एका समुद्रकिनारी पाणथळ जागी लावायचा प्रयत्न केला, तर तिथे ते आंब्याचे झाड कुजून जाईल, तिथे नारळच लागणार आणि फळणार ... याच पद्धतीने बाजारात तुम्हाला लाखो करिअर पर्याय आणि त्याला निवडण्याची साधने मिळतील, पण तिथे फक्त पर्याय मिळतील, जे एखाद्या करिअरच्या कलमाप्रमाणे असतील. त्याची मदत घेऊन तुम्ही फक्त करिअरचे झाड लावू शकता, परंतु त्याला फळ येईल की नाही, याची काहीही हमी नाही. सर्व करिअर पर्याय हे उत्तमच असतात, पण त्या करिअर पर्यायांसाठी आपण किती योग्य आहोत, याची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, म्हणून करिअर निवडण्याआधी आपली पार्श्वभूमी माहिती असणे आवश्यक आहे.

हे करून पहा
तुमचा स्वभाव कसा आहे?
तुमच्या आवडी-निवडी कोणत्या?
तुमचे खरे गुण आणि दोष कोणते? कौटुंबिक वातावरण आणि त्याची तुमच्याशी असलेल्या अनुकूलतेचा टक्का?
तुमचे सामर्थ्य आणि दुर्बलता कोणती?
तुमच्यात कोणती कौशल्ये आणि त्रुटी आहेत?
तुमचे व्यक्तिमत्त्व नक्की कसे आहे?
तुमची मानसिकता कोणती?
तुमचे ज्ञान आणि ज्ञानप्राप्तीची साधने ?
तुमचा दृष्टिकोन कसा आहे?
तुम्हाला आजवर किती संधी मिळाल्या आणि किती आव्हाने आलीत? किती संधींना तुम्ही यशात रूपांतरित केले?
तुम्ही आजवर किती वेळा नियोजन केले आणि त्यात किती टक्के यशस्वी झालात?
वरील बारा मुद्दे तुमच्या करिअरला समतोल करतात. म्हणून करिअर निवडण्याआधी वरील बाबी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींमुळे तुमचा जीवनाचा पाया मजबूत होतो. जेवढा मजबूत आणि खोल पाया, तेवढा मजबूत करिअरचा बंगला उभा राहू शकतो. उदा. जर तुम्ही उत्साही, थोडे रागीट, त्वरित निर्णय घेणारे, धाडसी असाल, तर तुम्ही एका इंजिनीयर किंवा लष्करी अधिकारी होऊ शकतात. त्याचप्रमाणे, तुम्हाला रंगसंगती, आकार, निसर्ग, नैसर्गिक सौंदर्य आवडत असेल, म्हणजे तुम्ही सर्जनशील व रचनात्मक व्यक्ती आहात आणि तुम्ही चांगले डिझाइनर, आर्किटेक, पेंटर किंवा एखादे सर्जनशील व्यक्ती होऊ शकता. अशाप्रकारे, तुम्ही बारा गोष्टींच्या मदतीने तुम्हाला जुळणारे करिअर निवडू शकता.
तुम्ही आधीच करिअर निवडले असेल तर? मग पुढे काय? अशा वेळी आम्ही करिअर कंसल्टंट वापर करतो, तो रिवर्स इंजिनीअरिंगचा. यामध्ये तुम्ही जर आधीच करिअर निवडलेले असते आणि ते करिअर तुमच्यासाठी किती टक्क्यांनी जुळते हे ठरवता येते आणि काही त्रुटी असतील, तर त्या दूर करण्याचा मार्ग दाखवला जातो. त्याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही घरीपण प्रयत्न करू शकता. दोन कागद घ्या. एका कागदावर तुम्ही निवडलेले करिअर आणि त्यासंबंधात बारा गोष्टी लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या करिअरची पार्श्वभूमी स्पष्ट होईल. नंतर दुसऱ्या कागदावर तुमच्या बारा गोष्टी लिहून काढा, म्हणजे तुम्हाला तुमचा पूर्ण अंदाज येऊन जाईल. आता सुरू करा... दोन्ही कागदांची तुलना. यामुळे तुम्हाला अंदाज येईल की, तुम्ही निवडलेल्या करिअरशी तुम्ही किती मिळते-जुळते आहात आणि किती पाऊल अजून दूर आहात. यामुळे तुम्हाला तुमचा स्वत:चा बिनचूक अंदाज येईल. मग काय पुढचे सर्व सोपे होऊन जाईल. मग एक गोष्ट मार्गी लागेल. ‘कमी तिथे तुम्ही!’ घरी नक्की प्रयत्न करून बघा, यश १०० टक्के मिळेल.


असे निवडा पर्याय- नेहमी करिअरचे ३ पर्याय निवडा.
- निवडलेल्या ३ पर्यायाचे स्वत:शी सेल्फ असेसमेंट किंवा रिव्हर्स इंजिनीअरिंग करून घ्या.
- करिअरचे माइलस्टोन (प्रगती दर्शन) ठरवून घ्या. उदा. - १०वी - (३पर्याय) - एक पर्याय निवडा
-१२वी/डिप्लोमा - ३ पर्याय - एक पर्याय निवडा
- करिअर स्टेप्स लिहा आणि पूर्ण करा -
- करिअर शैक्षणिक लक्ष्य ठेवून त्याची पूर्ती करा
- करिअरमध्ये ध्येय ठरवा - धारणा बनवा - लक्ष्यभेदन करा
- करिअरमध्ये प्रगतीचिन्ह ठरवा - बनवा आणि कौशल्य वाढवा (स्किल्स डेव्हलपमेंट).
- करिअर नियोजन अचूक करा - जे शून्य ते अंतिम मुक्कामापर्यंत घेऊन जाईल.

करिअरमधील गल्ल्या आणि थोडे शॉर्टकट
- करिअर पार्श्वभूमीच्या १२ गोष्टी जाणून घ्या.
- करिअरसंबंधी निगडित आय-क्यू, ई-क्यू, व्यक्तिमत्त्व कोड, मानसिकता यांचे परीक्षण करून घ्या.
- करिअरच्या शून्यापासून अंतिम मुक्कामापर्यंत जाईपर्यंत १०० छोटे-छोटे लक्ष्य आणि ध्येय बनवून घ्या आणि एके क पूर्ण करत जा.
वरील सर्व पावले जर तुम्ही योग्य पद्धतीने उचलली तर हमखास यश मिळेल आणि मिळालेले यश हे फक्त तुमचेच आहे.