'तुमच्या देशात निघून जा'; बांग्लादेशी घुसखोरांना 'मनसे' इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 10:02 IST2020-02-04T09:47:42+5:302020-02-04T10:02:29+5:30

तर याच मागणीसाठी मनसेच्या वतीने 9 फेब्रवारीला मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे.

Get out of your country MNS warns Bangladeshi | 'तुमच्या देशात निघून जा'; बांग्लादेशी घुसखोरांना 'मनसे' इशारा

'तुमच्या देशात निघून जा'; बांग्लादेशी घुसखोरांना 'मनसे' इशारा

मुंबई : बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, वर्सोवा भागामध्ये असलेल्या बांगलादेशी घुसखोरांनात्यांच्या देशात निघून जाण्याचा इशारा मनसेने दिला आहे.विशेष म्हणजे वर्सोवा भागात असे इशारा देणारे पोस्टर लावण्यात आले आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्याच्या मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या अधिवेशनात भारतातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.

तर याच मागणीसाठी मनसेच्या वतीने 9 फेब्रवारीला मोर्चाचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र त्याधीच आता वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना 'मनसे'ने इशारा देत तुमच्या देशात निघून जा अशा आशयाचे पोस्टर वर्सोव्यात परिसरात लावण्यात आलेले आहेत. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची नावे या पोस्टरवर आहेत.

 

Web Title: Get out of your country MNS warns Bangladeshi