सर्व कामे आटोपून ठेवा! मुंबईत धडकायचेय; मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:28 PM2023-12-26T12:28:45+5:302023-12-26T12:29:26+5:30

मी २० तारखेला पायी चाललो आणि २४ ला कसे दिल्लीला नेणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. 

Get all the work done! Want to strike in Mumbai; Manoj Jarange patil's Advice to Maratha Reservation Protesters | सर्व कामे आटोपून ठेवा! मुंबईत धडकायचेय; मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना सूचना

सर्व कामे आटोपून ठेवा! मुंबईत धडकायचेय; मनोज जरांगेंची मराठा आंदोलकांना सूचना

मुंबईतले आंदोलन सगळ्यात मोठे असणार आहे. सर्व कामे आटोपून ठेवा मुंबईत धडकायचे आहे. मिळेल त्या वाहनाने मुंबईत या. सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, आम्हाला पायी मुंबईला यायची हौस नाही. ज्या गावातून मराठा येणार त्यांचे नियोजन त्याच गावातील मराठा करणार आहेत, त्यामुळे जेवणाचा ताण पडणार नाही, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितले. 

तयारी आता पूर्ण होत आली आहे आता आम्ही सज्ज आहोत. मुंबईला जाण्याचा मार्ग उद्यापर्यंत फायनल होईल. मोठ्या ताकतीने मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचे नाही असे माझ्यासकट समाजाने ठरविले आहे. मुंबई मधील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांनी आमचे स्वागत केले पाहिजे, असे आवाहनही जरांगे पाटलांनी केले आहे. 

छगन भुजबळ काहीही बरळतात. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून शिकावा, भुजबळ आम्हाला काय संस्कार शिकवणार? मराठा, ओबीसींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई यांच्या जरांगेंना दिल्लीला नेणार या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. मी २० तारखेला पायी चाललो आणि २४ ला कसे दिल्लीला नेणार? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. 

आम्हाला ओबीसींमधून आरक्षण हवेय. आमची क्यूरीटीव्ह पीटिशनवर आमची शंका आहे. एकदा अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला मग माघार नाही. ओबीसी आरक्षणातून आम्ही आरक्षण मिळविणार पाहा तुम्ही, असे आव्हान जरांगे यांनी दिले आहे. आता मराठे सभेला जात नाहीत, धार्मिक सप्ताहाला जात नाही, आता कुठेच जात नाही. कायदा पारित करण्यासाठी आम्ही ४० दिवस दिले होते. राज्यातल्या मराठा समाजासाठी २४ डिसेंबर पर्यंत वेळ दिला होता. आमची बीडची सभा निर्णायकच ठरली.  समाजाला फसवायचे काम माझ्याकडून होणार नाही, असेही जरांगे म्हणाले. 

मराठा आरक्षणाबाबत जे आम्हाला निकष लावले आहे तो निकष इतर आरक्षणाला लावायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो आम्हाला ओबीसीमध्ये सरसकट घ्या. यादीतील ८३ क्रमांक जरी लागू केला तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण लागू होईल. मात्र राजकीय इच्छा शक्ती नाही. न्यायालयाने जर सांगितले असेल की जात मागास सिद्ध करा ते आयोगाला सिद्ध करावे लागेल. मात्र, जाचक आटी रद्द करायला पाहिजेत असे जरांगे म्हणाले.

Web Title: Get all the work done! Want to strike in Mumbai; Manoj Jarange patil's Advice to Maratha Reservation Protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.