शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

खऱ्या अर्थाने खंडेरायाची जेजुरी होणार आता ‘सोन्याची’ ...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 6:44 PM

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस आता सोन्याचा होणार असून शुक्रवारी (दि. २८) देवसंस्थानच्यावतीने विधिवत धार्मिक विधी करत या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुमारे दीड किलोपर्यंत शुद्ध सोने वापरण्यात येणार देणगीदान व नवसपूर्तीसाठी अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारांतून शुद्ध सोने तयार करून हे काम नवरात्र व दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणारपुरातन काळापासून खंडेरायाची जेजुरी सोन्याची नगरी म्हणून प्रचलित

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस आता सोन्याचा होणार असून शुक्रवारी (दि. २८) देवसंस्थानच्यावतीने विधिवत धार्मिक विधी करत या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.जेजुरीच्या खंडेरायाला राज्यातील भाविकांनी देणगीदान व नवसपूर्तीसाठी अर्पण केलेल्या आणि देवसंस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याच्या विविध अलंकारांमधून व चीजवस्तूंमधून मुख्य मंदिरावरील कलश सोन्याचे करण्यात येत आहे. यासाठी सुमारे दीड किलोपर्यंत शुद्ध सोने वापरण्यात येणार आहे. या कामासाठी राजस्थान येथून कुशल कारागीर बोलाविण्यात आले आहेत. सुमारे आठवडाभर इन कॅमेरा हे काम चालणार आहे. याबाबत माहिती देताना विश्वस्त पंकज निकुडे पाटील व शिवराज झगडे यांनी सांगितले, पुरातन काळापासून खंडेरायाची जेजुरी सोन्याची नगरी म्हणून प्रचलित आहे. हे नाव सार्थ करण्यासाठीच मुख्य मंदिराच्या कलशापासून शुभारंभ करण्यात येत आहे. तसेच  खंडेरायाच्या मुख्य मंदिरावरील कळस सोन्याचा करण्याबाबत मागील काळापासून भाविक व ग्रामस्थ मंडळ मागणी करीत होते. राज्यातील भाविकांनी देणगीदान व नवसपूर्तीसाठी अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारांतून शुद्ध सोने तयार करून हे काम करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात होणारी सोमवती यात्रा त्यानंतर नवरात्र व दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी देवसंस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर, तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :JejuriजेजुरीGoldसोनं