शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

‘लष्कर’चा दहशतवादी मुंबईत गजाआड

By admin | Updated: December 10, 2015 03:21 IST

लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा सदस्य असलेल्या असाऊद्दला खान उर्फ असद खान उर्फ अबू सुफियान (वय ५७) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हैदराबाद येथील पथकाने बुधवारी मुंबई विमानतळावर अटक केली

मुंबई : लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा सदस्य असलेल्या असाऊद्दला खान उर्फ असद खान उर्फ अबू सुफियान (वय ५७) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हैदराबाद येथील पथकाने बुधवारी मुंबई विमानतळावर अटक केली. बंगळुरु येथील एका खटल्यातील तो प्रमुख आरोपी असून गेल्या तीन वर्षांपासून सुरक्षा यंत्रणेला चकवा देत होता. अबू सुफियान मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने परिसरात पाळत ठेवून त्याला पहाटे अटक केली. त्याला बंगळुरु येथील न्यायालयात हजर करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बंगळुरु व हुबळी येथील धार्मिक नेते, पोलीस अधिकारी व पत्रकारांना मारण्याच्या कटात सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. (प्रतिनिधी)> कोण हा अबू सुफियान?अबू सुफियान हा मूळचा हैदराबाद येथील असून गेल्या अनेक वर्षांपासून तो ‘लष्कर’साठी देशविघातक कृत्य करीत असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लष्कर-ए-तोयबाचा २०१२ मध्ये बंगळुरु येथे एका धार्मिक सोहळ्यात धार्मिक नेते, पोलीस आणि पत्रकारांना मारण्याचा कट एनआयएच्या हैदराबाद पथकाने उघडकीस आणला होता. त्यामध्ये अबू सुफियानची भूमिका महत्त्वाची होती. तो विविध नावे वापरित व वेषभूषा बदलून देशभरात विविध ठिकाणी वास्तव्य करत होता.