लोणावळा: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी ज्वलनशील रसायन वायू वाहून नेणारा टँकर उलटला. टँकरमधून सुरू असलेल्या वायूगळतीमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक पूर्णतः बंद ठेवल्याने ३० तास महामार्ग ठप्प राहिला. परिणामी, द्रुतगती महामार्गासह जुना मुंबई-पुणे महामार्गही प्रभावित होऊन २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कोंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती व भविष्यात अशी घटना घडू नये, घडल्यास कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारशींसह अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्यानजीक टँकर अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. गॅस गळतीमुळे महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवल्याने अभूतपूर्व कोंडी झाली. या कोंडीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, कॅन्सरग्रस्तांसह इतर आजारी व्यक्तींना त्रास झाला.
टोल नाका केला बंद
बुधवारी सकाळपर्यंत टोल नाक्यावर टोल आकारणी सुरू होती. यावर टीका झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) बुधवारी सकाळपासून टोन आकारणी बंद केली. आता वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोल आकारणी बंद ठेवली जाणार आहे, असेही अधिकान्यांनी सांगितले.
वाहतुकीत केले बदल
गॅस अति ज्वलनशील असल्याने पोलिसांनी तातडीने मुंबई मार्गिकेवरील वाहतूक रोखली. रात्री ०७:३० वाजेच्या सुमारास महामार्ग पोलिसांनी वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे मार्गिकेतील एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. तसेच हलक्या वाहनांना किमी मॅजिक पॉइंट येथून खोपोलीमार्गे जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर वळवण्यात आले, अशी माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी दिली आहे. किवळे येथून एक्स्प्रेस-वेवर होणाऱ्या वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली.
Web Summary : A tanker leak near Adoshi tunnel blocked Mumbai-Pune Expressway for 30 hours. Traffic halted, causing 25km backups. Old highway also affected. Inquiry ordered. Toll collection suspended till traffic is normal. Light vehicles diverted via Khopoli.
Web Summary : आडोशी सुरंग के पास टैंकर रिसाव से मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 30 घंटे जाम रहा। यातायात रोका गया, 25 किमी तक जाम लग गया। पुराना राजमार्ग भी प्रभावित। जांच के आदेश। यातायात सामान्य होने तक टोल संग्रह निलंबित। हल्के वाहन खोपोली के रास्ते मोड़े गए।