शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

गणपत गायकवाड शिवसेनेच्या वाटेवर?

By admin | Updated: August 21, 2014 00:03 IST

कल्याण पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहयोगी अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरात चर्चा आहे.

कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहयोगी अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू असताना त्यांच्या प्रवेशाला शिवसेनेच्या महापौर कल्याणी पाटील यांच्यासह कल्याण पूर्वेतील सेनेच्या 11 नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात पक्षाचे ठाणो जिल्हा संपर्क प्रमुख  आमदार एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना निवेदन सादर करून नाराजी व्यक्त केली आहे. गायकवाड यांना प्रवेश देऊन उमेदवारी दिल्यास मोठया प्रमाणावर बंडाळी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
लोकसभा निवडणुकीत आमदार गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार  आनंद परांजपे यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करीत त्यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या शुक्रवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गायकवाड समर्थकांनी गोंधळ घालत पदाधिका-यांविरोधात घोषणाबाजी केली होती. दरम्यान राष्ट्रवादीवर नाराज असलेले गायकवाड हे आता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत त्यांनी सध्या मौन बाळगले असले तरी त्यांच्या प्रवेशाला मातोश्रीवरून ही हिरवा कंदील दाखल्याचे वृत्त असल्याने स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकत्र्यामध्ये असंतोष पसरला आहे. महापौर पाटील यांच्यासह कल्याण पूर्वेतील सेनेच्या 11 नगरसेवकांनी मंगळवारी रात्रौ उशीरा शहरप्रमुख विजय साळवी यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन सादर केले. यानंतर जिल्हा संपर्क प्रमुख शिंदे यांचीही भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार गायकवाड यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाचे अधिकृत उमेदवार पुंडलिक म्हात्रे यांचा पराभव केला होता तसेच महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाविरोधात 25 उमेदवार उभे केले होते, गायकवाड हे पक्षाविरोधात काम करीत असल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशावर आणि त्यांना उमेदवारी देण्यावर हरकत असल्याचे पत्र पक्षप्रमुखांनाही पाठविण्यात आले आहे. 
विरोध असतानाही जर गायकवाडांना पक्षाकडून प्रवेश आणि उमेदवारी मिळाल्यास स्थानिक शिवसैनिक अथवा पदाधिका-यांनी अपक्ष उमेदवाराच्या माध्यमातून निवडणूक लढवून गायकवाड यांचा पराभव करण्याची तयारी केली आहे. मागील निवडणुकीत देखील स्थानिकांना डावलून राष्ट्रवादीतून आलेल्या  पुंडलिक म्हात्रे यांना शिवसेनेने उमेदवारी बहाल केली होती. या पाश्र्वभूमीवर स्थानिकांना प्राधान्य देण्याबरोबरच अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी) 
 
पक्षात कोणाला प्रवेश दयायचा? कोणाला उमेदवारी दयायची? हा सर्वस्वी अधिकार पक्षप्रमुखांचा आहे परंतु गायकवाड यांना प्रवेश देण्यास स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवकांचा विरोध आहे. वरीष्ठ नेत्यांना आमच्या भावना कळविण्यात आल्या असून याबाबत विचार केला जाईल असे आश्वासन जिल्हा संपर्क प्रमुखांनी दिले आहे.
- कल्याणी पाटील, महापौर केडीएमसी 
 
कोणत्याही पक्षात गेलो तरी तेथे निवडणूक लढविणा-या इच्छूकांकडून विरोध हा होणारच आहे. शिवसेना  प्रवेशाबाबत कोणताही निर्णय अद्यापर्पयत झालेला नाही
- गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व मतदारसंघ