शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव :...म्हणून या गावातील ग्रामस्थ चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 15:01 IST

गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये कोकणामध्ये घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही.

सिंधुदुर्ग - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने नियमांच्या चौकटीत राहून गणपतीचे पूजन केले जात आहे. त्यातही गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये कोकणामध्ये घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही.या गावाचं नाव आहे कोईळ. मालवण तालुक्यात असलेल्या या गावामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा केली जात नाही. या गावात सुमारे साडे तीनशे ते चारशे घरे आहेत मात्र यापैकी एकाही घरात गणेश चतुर्थीला गणपती आणला जात नाही. याचं कारण म्हणजे या गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे. गावातील रहिवाशा्ंनी गावातील याच गणपतीचं पूजन करावं, असा दंडक येथे शेकडो वर्षांपासून पाळला जात आहे. घरी गणपतीची पूजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये अनेक अडथळे येतात, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.या गावाता अजूनही घरगुती गणपती आणला जात नाही. घरगुती गणपतीऐवजी गणेशोत्सवादरम्यान गावातील गणेश मंदिरात सात दिवस उत्सव साजरा केला जातो. यादरम्यान, गावातील मंडळी, तसेच बाहेरगावी राहणारे चाकरमानी गावात येतात. यावेळी गावच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होते.दरम्यान, या गावातील ग्रामस्थ जसे घरी घरगुती गणपतीची पूजा करत नाहीत. तसेच येथील घरांमध्ये गणपतीच्या तसबिरीसुद्धा लावल्या जात नाहीत. घरांमध्ये इतर देवतांचे फोटो ठेवले जातात. तसेच वेळेप्रसंगी सत्यनारायणाची पूजाही होते. मात्र घरी गणपतीची पूजा होत नाही. तसेच गावातील कुठल्याही मंगलप्रसंगी सर्वप्रथम या मोरयाला मान दिला जातो.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAdhyatmikआध्यात्मिकMaharashtraमहाराष्ट्रsindhudurgसिंधुदुर्ग