शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

गोव्यात कुख्यात गुंड अश्पाक बेंग्रेचा गेम

By admin | Updated: July 26, 2016 21:05 IST

कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात कुख्यात गुंड अश्पाक बेंग्रे याचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

कोलवाळ येथील कारागृहात बंदिवानाने चिरला गळाबार्देस : कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात कुख्यात गुंड अश्पाक बेंग्रे याचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अश्पाकवर हल्ला करून त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली कारागृहात शिक्षा भोगत असलेला विनायक कारबोटकर याला अटक करण्यात आली आहे.आरोपी विनायक व अश्पाक यांच्यातल्या बाचाबाचीचे पर्यावसान खुनात झाले, असे वरकरणी दिसत असले, तरी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे विश्वासार्ह सूत्रांनी सांगितले. खून, प्राणघातक हल्ले, अमली पदार्थाचा व्यापार, खंडणी उकळणे यासारख्या अनेक गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचा आरोप असलेल्या अश्पाक बेंग्रे याला जामिनाच्या कालावधीत वाढ करण्यासाठी न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्याला ठार करण्यात आले. तत्पूर्वी त्याला जबर मारहाणही झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. मारहाणीचे व्रण त्याच्या तोंडावर, हातावर, गालावर, पाठीवर तसेच अंगावर अनेक ठिकाणी उमटले होते. ही मारहाण तुरुंगातील अंतर्भागात झाली, तर मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील भागात त्याचा खून करण्यात आला.घटनेनंतर लगेच अश्पाक याला म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसानी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून बुधवारी शवचिकित्सा होणार आहे. हत्येचा आरोप असलेल्या कारबोटकरला रिमांडसाठी बुधवारीच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही तुरुंगात वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्याच ठिकाणी वादाला सुरुवात झाली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि शेवटी कारबोटकर याने पाठीमागून येत अश्पाक याच्यावर अचानक हल्ला केला. सुरुवातीच्या तुंबळ मारामारीनंतरही कारबोटकरचे समाधान झाले नाही व या वैमनस्याची परिणती अश्पाकच्या खुनात झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर, महानिरीक्षक विमल आनंद गुप्ता, तुरुंग महानिरीक्षक एल्वीस गोम्स, गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप, उत्तर गोव्याचे अधीक्षक उमेश गावकर, उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक तुषार लोटलीकर, न्यायदंडाधिकारी नारायण गाड घटनास्थळी दाखल झाले. कारागृहातील अधिका-यांसमवेत त्यांनी नंतर चर्चा केली. रात्री उशिरार्पयत पोलिसांची चौकशी सुरूच होती.

अश्पाक याच्यावर गोव्यासह कर्नाटक, चंदिगढ येथे खंडणी मागणे, अमली पदार्थांचा व्यापार, सुपारी घेउन हत्या करणे, घरफोडी, दरोडे अशासारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याला अनेक वेळा अटकही करण्यात आली होती. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो आपले राहण्याचे स्थान वारंवार बदलत होता. गेल्या वर्षी मे महिन्यात अमली पदार्थ व्यवहार प्रकरणात चंदिगढच्या पोलिसांनी त्याला अटक केली होती. नंतर त्याला तेथून गोव्यात हस्तांतरण रिमांडवर आणण्यात आले होते.- कारागृहाचे महानिरीक्षक एल्वीस गोम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्पाक व कारबोटकर यांची कारागृहातच झटापट झाली. त्यातच त्याचा खून झाला. हा खून कशा पद्धतीने करण्यात आला, याची माहिती उपलब्ध होउ शकली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे गोम्स म्हणाले.- अश्पाक बेंग्रेचा कारागृहात खून करण्यामागचे कारण स्पष्ट होउ शकले नसले, तरी पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका:याने दिली. एकाच व्यक्तीकडून खून झाला असून हे समूहाचे कृत्य नव्हे, असे न्यायदंडाधिकारी नारायण गाड यांनी या प्रतिनिधीला सांगितले.- या हत्येनंतर कारागृहातील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी अधिक स्पष्ट झाल्या आहेत. कारागृहातील सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत झालेली मारहाण सुरक्षेविषयीचा निष्काळजीपणा दाखवून देते. खून करण्यासाठी वापरलेले हत्यार कारागृहात कसे आणले गेले किंवा कारागृहातच उपलब्ध असलेली एखादी वस्तू हत्या करण्यासाठी वापरण्यात आली का, यावर बोलण्यास पोलीस अधिकारी तयार नव्हते.- गत वर्षी घटक राज्यदिनी 30 मे रोजी कोलवाळ येथील कारागृहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कारागृहात घडलेला हा खुनाचा पहिलाच प्रकार आहे. गेल्या वर्षी सडा जेलमधून कोलवाळ कारागृहात आणलेल्या कैद्यांना मारहाण करण्याचा प्रकारही इथे घडला होता.- अश्पाक हा गोव्यातून एलएसडी, एमएसडीएम तसेच विदेशातून गोव्यात आणलेले अमली पदार्थ चंदिगढला नेउन तेथे विक्री करत होता. त्याचे फ्रान्स, स्पेन तसेच रशियातील ड्रग्स माफियांशी संबंध होते. पंजाब पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर तेथे दिलेल्या माहितीतून हे संबंध उघड झाले होते. त्याची एकूण मालमत्ता 80 कोटी रुपयांहून जास्त असल्याचे पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत आढळून आले होते.