जुगारामुळे एकाच वेळी दोन कुटुंबावर दुख:चा डोंगर; एकाची हत्या, दुसऱ्याला अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:45 IST2025-08-21T16:44:28+5:302025-08-21T16:45:39+5:30

Yavatmal Murder: यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात जुगार खेळताना झालेल्या वादातून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

Gambling brings grief to two families at once; one killed, another arrested! | जुगारामुळे एकाच वेळी दोन कुटुंबावर दुख:चा डोंगर; एकाची हत्या, दुसऱ्याला अटक!

जुगारामुळे एकाच वेळी दोन कुटुंबावर दुख:चा डोंगर; एकाची हत्या, दुसऱ्याला अटक!

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात जुगार खेळताना झालेल्या वादातून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी ६.०० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

संजय प्रभाकर कावरे (वय, ४३) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, संदीप सूर्यभान इसापुरे (वय, ४०) असे आरोपीचे नाव आहे. संजय आणि संदीप हे गणेशपूर येथील स्मशानभूमी परिसरात इतर लोकांसोबत जुगार खेळत होते. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून बाचाबाची झाली. काही वेळातच परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. हाणामारीदरम्यान संदीप जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून संजयच्या डोक्यात घातला. 

आरोपीला अटक
या घटनेत संजय गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात पोहोण्याआधीच त्याचा मृ्त्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपी संदीपला ताब्यात घेतले. तर, संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तीन दिवसांत दोन हत्या
महत्त्वाचे म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच वणी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मंदार गावातील लेआउटमध्ये अज्ञात लोकांनी ६० वर्षीय वृद्धाची हत्या केली. त्या प्रकरणाचे गूढ अद्याप उलगडले नसताना गणेशपूरमध्ये आणखी एक खूनाची घटना घडली. सतत होणाऱ्या खून घटनांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे गस्त वाढवण्याची आणि बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Gambling brings grief to two families at once; one killed, another arrested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.