शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

गदिमांच्या निवडक कथा ‘इंग्रजीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:04 IST

प्रा. विनया बापट यांनी चौदा कथा करण्याचा घेतला ध्यास

- नम्रता फडणीस पुणे : मराठी साहित्य दर्जेदार साहित्यिकांच्या सिद्धहस्त लेखणीतून अधिकाधिक समृद्ध झाले. परंतु मायबोलीतील साहित्य इंग्रजीसह इतर भाषांमध्ये फारसे अनुवादित न झाल्यामुळे जागतिक क्षितिजापर्यंत त्याचा विस्तार अद्यापही होऊ शकलेला नाही. मात्र मराठीमधील विविध लेखकांच्या उत्तमोत्तम कलाकृती इंग्रजीमध्ये आणण्याचा ध्यास पुण्यातील प्राध्यापिका विनया बापट यांनी घेतला असून, ‘गीतरामायण’ घराघरांत पोहोचविणाऱ्या ग. दि. माडगूळकर यांच्या चौदा निवडक कथा त्यांनी इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. येत्या १ आॅक्टोबरला गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात होत आहे. त्यानिमित्त नव्या पिढीसाठी गदिमांच्या कथा इंग्रजीमध्ये येणं हा सुंदर योग जुळून आला आहे.‘इंग्रजी’ ही व्यवहाराची भाषा मानली जाते. जागतिक दर्जाचे साहित्य प्रादेशिक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुवादित झाल्यामुळे इंग्रजी साहित्याशी नवी पिढी अवगत झाली आहे. मात्र वाङ्मयविश्वात अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले असले तरी केवळ हे साहित्य इंग्रजीमध्ये अनुवादित न झाल्यामुळे नव्या पिढीला आपल्याच मायबोलीच्या साहित्यिकांची फारशी ओळख झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपली मराठी ग्रंथ संपदा जागतिक ज्ञानभाषेमध्ये रूपांतरित झाली तर साहित्यिकांची थोरवी विश्वपटलावर गायली जाणार आहे. याच जाणीवेतून काही मराठी भाषिकांकडून इंग्रजी अनुवादासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत, त्यातीलच एक नाव म्हणजे प्रा. विनया बापट.एसएनएनडी महाविद्यालयात दहा वर्षे इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या. पंचवीस वर्षे त्या इंग्रजी विषय शिकवित आहेत. इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असलेल्या बापट यांना अनुवादाची आवड असल्याने प्रारंभीच त्यांनी गदिमांच्या आत्मचरित्रासह त्यांच्या काही निवडक कथा इंग्रजीत अनुवादित करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. या कथांचा अनुवाद पूर्ण झाला असून, त्यासाठी त्यांचा प्रकाशकाचा शोध सुरू आहे.याविषयी ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, मी गदिमांच्या साहित्याची खूप मोठी चाहती आहे. गदिमांचे आत्मचरित्र मला आधी अनुवादित करायचे होते. पण गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांनी गदिमांच्या कथा उत्तम आहेत त्यापासून अनुवादाला सुरुवात करावी, असे सांगितले.अमराठी वाचकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून गदिमांच्या कथा अनुवादित केल्या आहेत. नवी पिढीदेखील मराठी साहित्यामधील अमूल्य ठेव्यापासून वंचित राहू नये, हा या अनुवादामागील उद्देश आहे. गदिमांचे आत्मचरित्र इंग्रजीत अनुवादित करण्याचे कामही सुरू आहे.- प्रा. विनया बापट, अनुवादिकागदिमांचे साहित्य इंग्रजीमध्ये अद्यापही अनुवादित झालेले नाही. केवळ ‘गीतरामायण’ हे एका निवृत्त न्यायाधीशांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केले आहे. गदिमांच्या पुष्कळ कथा या जागतिक दर्जाच्या आहेत. नवीन पिढी इंग्रजीमध्ये शिकलेली आहे, त्यांच्यापर्यंत हे अनुवादित साहित्य पोहोचेल आणि त्यांच्यात मराठीची गोडी निर्माण होईल. ‘थोरली पाती’, ‘सोने आणि माती’, ‘बोलका शंख’ आदी पुस्तकातील ‘मी आणि माती’, ‘औंदाचा राजा’, ‘सिनेमातील माणूस’ अशा विविध चौदा कथा प्रा. विनया बापट यांनी घेतल्या आहेत. गदिमांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त कथांचा इंग्रजी अनुवाद होणे हा छान योग जुळून आला आहे.- सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू 

टॅग्स :Puneपुणे