गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसामुळे कासाडी नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे. नदीलगत असलेल्या पनवेल कोळीवाड्यात पावसाचे पाणी शिरले.याची माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी याठिकाणी पाहणी करीत आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या.
शहरात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी जवळील एचओसी आदिवासी वाडीत देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने येथील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली.नवीन पनवेलच्या काही भागात पाणी साचले होते.पनवेल शहरकळंबोली सखल भागात पाणी साचले होते.मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात निर्माण झालेल्या पूर स्थितीचा धडा घेत प्रशासनाने ठीक ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप लावल्याने बहुतांशी ठिकाणचा पाणी योग्य रित्या निचरा झाल्याने यावेळेला कळंबोलीत बहुतांशी भागात पाणी साचले नाही.दरम्यान कासाडी देखील दुथडी वाहत होती.एमआयडीसी रोड,पळस्पे फाटा,एसी कॉलेज फाटा याठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीस काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता.