शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. गो. बं. देगलूरकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 1:14 PM

यंदाच्या संमेलनासाठी पुरातन स्थापत्यशास्त्र हा विषय केंद्रस्थानी असून या विषयाशी संबंधित विशेष परिसंवाद आणि मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकंबोडिया येथील अंग्केरवाट येथे २८ ऑगस्ट रोजी हे संमेलन होणार

पुणे : विश्व मराठी परिषद आणि शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांची निवड झाली आहे. कंबोडिया येथील अंग्केरवाट येथे २८ ऑगस्ट रोजी हे संमेलन होणार आहे. यंदाच्या संमेलनासाठी पुरातन स्थापत्यशास्त्र हा विषय केंद्रस्थानी असून या विषयाशी संबंधित विशेष परिसंवाद आणि मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. कंबोडिया येथील अंग्कोरवाट येथील प्राचीन वैभवशाली मंदिर हे भारतीय स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना मानले जाते. अशा ठिकाणी याच विषयाशी केंद्रीत राहून होत असलेले संमेलन निश्चित वेगळे ठरेल, अशी माहिती विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी शुक्रवारी दिली. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ माध्यमतज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात ' मला भेटलेली माणसं ' हा एकपात्री कार्यक्रम डॉ. मेहेंदळे सादर करणार आहेत.-----------------------------------------------मंदिरे आणि मूर्ती भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण : डॉ. गो.बं देगलूरकर मंदिरे आणि मूर्ती हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मानवी मन, धर्म, तत्त्वज्ञान आणि कलांचा विचार संस्कृतीमध्ये मंदिरे आणि मूर्तीद्वारे अधोरेखित होतो.  मूर्ती आमच्या हृदयात आणि देवघरात आहेत, अशी भावना डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केली. अंग्कोरवाट मंदिराचे देशाच्या राष्ट्रध्वजावर आणि चलनी नोटांवर चित्र असलेला कंबोडिया हा जगातील एकमेव देश आहे. कंम्बुज या व्यक्तीवरून देशाला कंबोडिया हे नाव पडले. अंग्कोरवाट मंदिराचा परिसर भव्य असून प्रदक्षिणा घालण्यासाठी काही किलोमीटर अंतर चालावे लागते. रामायण, महाभारत आणि पुराणातील कथा शिल्पाकृतींद्वारे मंदिराच्या भिंतीवर पाहावयास मिळतात, असे देगलूरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य