‘अवकाळी’ बाधितांना ३३७ कोटी ४१ लाखांचा निधी, राज्यातील ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:21 IST2025-07-30T16:20:37+5:302025-07-30T16:21:14+5:30
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली माहिती

संग्रहित छाया
सातारा : राज्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यांच्या नुकसानीपोटी शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतका निधीस मान्यता दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
राज्यातील काही जिल्ह्यांत यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त व बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने पंचनामे करण्यात आले. खरिप पेरणीच्या काळात नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने तातडीने निधी मंजूर केला, असे पाटील यांनी सांगितले.
विभागनिहाय नुकसानभरपाईचा निधी..
विभाग | शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र | निधी |
छ. संभाजीनगर | ६७ हजार ४६२ | ३४ हजार ५४२ हेक्टर | ५९ कोटी ९८ लाख |
पुणे | एक लाख ७ हजार | ४५ हजार १२८.८८ हेक्टर | ८१ कोटी २७ लाख |
नाशिक | एक लाख ५ हजार | ४५ हजार ९३५ हेक्टर | ८५ कोटी ६७ लाख |
कोकण | १३ हजार ६०८ | ४ हजार ४७३ हेक्टर | ९ कोटी ३८ लाख |
अमरावती | ५४ हजार ७२९ | ३६ हजार १८९ हेक्टर | ६६ कोटी १९ लाख |
नागपूर | ५० हजार १९४ | २० हजार ७८ हेक्टर | ३४ कोटी ९१ लाख |