शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या समर्थनासाठी मोर्चा

By admin | Updated: October 7, 2016 05:52 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ बारामती शहरात गुरुवारी बहुजन समाजाने विराट क्रांती मोर्चा काढला. दलित, ओबीसी, मुस्लिम समाजातील बांधव लाखोच्या

बारामती (पुणे) : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ बारामती शहरात गुरुवारी बहुजन समाजाने विराट क्रांती मोर्चा काढला. दलित, ओबीसी, मुस्लिम समाजातील बांधव लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, कोपर्डीसह देशातील अन्य बलात्काराच्या घटनांमधील आरोपींना फाशी द्या, अशी मागणी करीत हा मोर्चा निघाला.शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. कसबा येथील शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील इंदापूर चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, गुणवडी चौक, भिगवण चौक मार्गे मोर्चा मिशन हायस्कूलच्या भव्य मैदानावर स्थिरावला. या वेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या मोर्चात मागासवर्गीयांसह मुस्लिम, धनगर समाजबांधवांसह महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उन्हाचा तडाखा तीव्र असतानादेखील मोर्चातील उपस्थितांची संख्या लक्षणीय होती. मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. विजय गव्हाळे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. अनेक वर्षे सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबविल्या नाहीत? असे गव्हाळे म्हणाले. प्रस्थापित राजकीय नेतेच साखर सम्राट, दूध सम्राट आणि शिक्षणसम्राट आहेत. त्यांनीच शिक्षण महाग केले. या प्रस्थापितांना खऱ्या अर्थाने जाब विचारण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. परंतु आरक्षण मागण्याची वेळ का आली, याचे आत्मपरीक्षणदेखील त्यांनी करावे. असेही गव्हाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, इतर मागासवर्गीयांना या कायद्याच्या कक्षेत घ्यावे, मराठा, धनगर मुस्लिमांना आरक्षण मिळावे, कोपर्डीसह राज्यात त्यापूर्वी घडलेल्या बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, गोररक्षणाच्या नावाखाली होत असलेले अत्याचार थांबवावेत, मागासवर्गीयांचा नोकऱ्यांतील अनुशेष भरून काढावा, मागासवर्गीयांना स्वरक्षणासाठी शस्त्र परवाने द्यावेत, अशा मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी हेमंत निकम यांना देण्यात आले.हा ‘प्रति मोर्चे’ नाही, तर हा ‘मैत्री मोर्चा’ आहे. मात्र, कोपर्डीच्या प्रकरणाचा निषेध करीत असताना चुकीच्या पद्धतीने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची मांडणी केली जाते.- सूर्यकांत वाघमारे,जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पक्ष