शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शाह, शाहरुख-सलमान ते अंबानी... देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला मान्यवरांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:25 IST

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.

Devendra Fadnavis Oath Taking : भाजप नेते देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात महाराष्ट्राच्यामुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांसह अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त उद्योग, चित्रपट आणि क्रीडा जगतातील अनेक मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित असतील. यामध्ये नीता अंबानी, सलमान खान अन् शाहरुख खानचा समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी 5.30 वाजता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला हजारो लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांसह किमान 10 केंद्रीय मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध व्यक्तीशपथविधी सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि राधिका अंबानी यांच्याशिवाय अनंत अंबानी, प्रणय अदानी हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. अंबानी कुटुंबाव्यतिरिक्त नोएल टाटा, दीपक पारिख, कुमार मंगलम बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, गीतांजली किर्लोस्कर, मानसी किर्लोस्कर हे देखील या कार्यक्रमाचा भाग असतील.

बॉलिवूडमधून अनेकांची हजेरीया शपथविधी सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहरेही उपस्थित राहणार आहेत. शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, विकी कौशल, खुशी कपूर, रूपा गांगुली, सिद्धार्थ रॉय, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, बोनी कपूर आणि एकता कपूर यांच्यासह श्रद्धा कपूर, जय कोटेक, विक्रांत मॅसी आणि जयेश शाह यांचाही समावेश असेल. भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकरसह या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी चार हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्रीmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024