शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याचं प्रमोशन? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्त्र डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
7
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
8
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
9
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
10
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
11
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
12
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
13
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
14
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
15
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
16
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
17
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
18
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
19
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
20
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा

एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 06:13 IST

बैठकीत अडसूळ यांच्या गटाचे संचालक बैठकीचे चित्रीकरण करीत होते. त्यांना गुणरत्न सदावर्ते गटाचे  संचालक घाडगे यांनी विरोध केला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बुधवारी झालेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हाणामारी झाली. एका गटाचे संचालक बैठकीच्या चित्रीकरणास झालेल्या विरोधातून बाटलीफेक, शिवीगाळ आणि संचालकांमध्ये झटापट झडल्याचे समजते.    

या बैठकीत अडसूळ यांच्या गटाचे संचालक बैठकीचे चित्रीकरण करीत होते. त्यांना गुणरत्न सदावर्ते गटाचे  संचालक घाडगे यांनी विरोध केला. बैठकीतील माहिती बाहेर जाता कामा नये, असे घाडगे म्हणाले. त्यावर त्यांच्या शेजारी बसलेल्या एका सदस्याने तावातावाने उठून समोर बसलेल्या सदस्यांवर पाण्याची बाटली फेकून मारली.  यावेळी दोन्ही गट शिवीगाळ करीत भिडले. या घटनेचा एक व्हिडीओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेची नोंद नागपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

बैठक सुरू असताना भ्रष्टाचार, बेकायदा कामे आणि गैरवर्तणुकीच्या मुद्द्यावरून संचालकांमध्ये वाद निर्माण झाला. बाहेरून लोक बोलावून मारहाण केल्याचा आरोप दोन्ही गटांनी परस्परांवर केला आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच बँकेचे अध्यक्ष माधव कुसेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पळालो नसतो तर जीव गेला असता!एसटी बँकेचे संचालक संतोष राठोड यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून बँकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. आम्ही सहकार आयुक्त आणि अध्यक्षांकडे तक्रारी केल्या आहेत. आज आम्ही पळून गेलो नसतो, तर आमचा जीव गेला असता. गुणरत्न सदावर्ते हे बँकेत घोटाळे करत असून, या हल्ल्यामागे त्यांचा हात आहे. 

‘गैरव्यवहार लपवण्यासाठी गदारोळ’ एसटी कर्मचारी काँग्रेसनेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, चेअरमन आणि व्हाइस चेअरमन बैठकीला हजर नसल्याने राडा झाला. बँकेत बेकायदा भरती, संगणक खरेदी आणि पैशांची उधळपट्टी सुरू आहे. हे सर्व लपविण्यासाठी हा गदारोळ घातला आहे. 

डेटा एन्ट्री कामात ३० कोटींचा भ्रष्टाचार!एसटी कामगार संघटनेचे तसेच कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, सदावर्ते गटाने जाणूनबुजून हा हल्ला केला. बाहेरून आणलेल्या लोकांनी सभागृहात गोंधळ घातला. भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न उपस्थित केला, तेव्हा राडा घडवून आणला गेला. सौरभ पाटील एमडी असताना १२ कोटींच्या डेटा एन्ट्री कामात ३० कोटींचा भ्रष्टाचार झाला. हे उघड होऊ नये म्हणूनच पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Brawl at ST Bank Meeting: Bottles Thrown, Abuse, Allegations Fly

Web Summary : Chaos erupted at an ST Cooperative Bank meeting with physical altercations and accusations of corruption. Disputes over filming the meeting escalated, leading to bottle throwing and verbal abuse. Allegations of corruption and illegal activities fueled the conflict, with both sides blaming each other for the violence.
टॅग्स :state transportएसटीGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्ते