शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

नीलम गोऱ्हे यांचा उपसभापती होण्याचा मार्ग मोकळा; सोमवारी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 06:39 IST

विजय वडेट्टीवारांचेही नाव विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर होण्याची शक्यता

- अतुल कुलकर्णी मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या आ. नीलम गोºहे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून सोमवारी त्यांची निवड होईल. काँग्रेसने यासाठी आग्रह धरला होता. मात्र भाजपने विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद हवे असेल तर उपसभापतीपदाचा निर्णय घ्या, असे सांगत काँग्रेसची गोची केली होती.काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांची मुदत १७ जुलै २०१८ ला संपली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. यावर काँग्रेस हक्क सांगत होती. शरद रणपिसे, अमर राजूरकर आणि भाई जगताप हे नेते त्यासाठी उत्सुक होते. आपल्याकडे संख्याबळ आहे असे म्हणत काँग्रेसने आग्रह कायम ठेवला होता. मात्र राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसचे गटनेते झाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते करा, असे पत्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिले. त्याचवेळी भाजप शिवसेनेने उपसभापतीपद आम्हाला द्या, नाहीतर वडेट्टीवार यांना हे पद देणार नाही, असे सांगितले. आ. गोऱ्हे उपसभापती झाल्या की वडेट्टीवार यांचेही नाव विरोधी पक्ष नेता म्हणून जाहीर केले जाईल.दिल्लीपर्यंत हा विषय काँग्रेसने नेला. शेवटी गुरुवारी रात्री या पदासाठी आपण लढायचे नाही, असा निर्णय घेतला गेला. त्यामुळे सोमवारी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे या पदासाठीची निवडणूक जाहीर करतील. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारपर्यंत वेळ दिला जाईल व एकच नाव आल्यास दुपारी नाव जाहीर केले जाईल. शिवसेनेने आ. नीलम गोऱ्हे यांचे नाव निश्चित केले आहे. शिवसेनेतून काही नेत्यांचा त्यांच्या नावाला विरोध होता. त्यामुळेही या सगळ्या निवडीला विलंब होत होता.परिचारक यांचे निलंबन रद्द, शिवसेना गप्पविधानपरिषदेचे संख्याबळ ७८ आहे. त्यात दोन्ही बाजूची संख्या आज ३९ एवढी आहे. त्यामुळे जर मतदान झाले तर ‘कांटे की टक्कर’ होईल म्हणून उपसभापतीपदासाठी अडचण होऊ नये म्हणून शिवसेनेने आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा लावून धरलेला मुद्दा अखेर सोडून दिला व त्यांचे निलंबन मागे घेतले गेले.सैनिकांच्या पत्नीविषयी अपशब्द वापरणाऱ्या परिचारक यांच्याबद्दल सेनेने घेतलेली कठोर भूमिका एका उपसभापतीपदासाठी सोडून दिली त्यामुळे यांचे सैनिकांविषयी प्रेम किती बेगडी आहे हे स्पष्ट झाले, अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.विधान परिषदेचे संख्याबळराष्ट्रवादी काँग्रेस १७काँग्रेस १६भाजपा २३शिवसेना १२लोकभारती १शेकाप १पिपल्स रिपब्लिकन पार्टी १राष्ट्रीय समाज पक्ष १अपक्ष ६एकूण ७८

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाVidhan Parishadविधान परिषदBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस