शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महायुती सरकारचा यू टर्न! अखेर 'ती' चूक कबूल केली; शासकीय रुग्णालयात यापुढेही मोफतच उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 10:43 IST

आरोग्य विभागाच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयान्वये अन्वये निशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत असं शासनाने स्पष्ट केले.

मुंबई - शासकीय रुग्णालयातील उपचारांचे दरपत्रक सरकारने एक परिपत्रक काढून जारी केले. यावरून मोठा वाद झाला. या वादावर पडदा टाकताना सरकारने अनवधानाने परिपत्रकात दरांचा उल्लेख केला अशी चूक कबूल केली. त्यानंतर नव्याने शुद्धिपत्रक काढून शासकीय रुग्णालयात मोफतच उपचार होतील असे स्पष्ट केले.

सरकारने स्पष्टीकरण दिले की, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार हे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयान्वये अन्वये निशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ठ-तीन मध्ये सेवा सुविधा पुरविण्यासाठी  ६ जून २०१५ च्या शासन निर्णयातील शासन मान्य दर अनवधानाने समाविष्ठ झाले. प्रत्यक्षात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी व उपचार निःशुल्क करण्यात आलेले असल्याने नागरिकांच्या सनदेमधील परीशिष्ठ-तीन हे ९ फेब्रुवारी २०२६ च्या  च्या शुध्दीपत्रकान्वये वगळण्यात आले आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

काय आहे प्रकरण?

१६ जानेवारी २०२६ रोजी सरकारने नागरिकांची सुधारित सनद प्रसिद्ध केली होती. त्यात वैद्यकीय उपचारांचे दर वाढल्याचे नमूद केले. ही माहिती अलीकडे अनेक वृत्तपत्रात छापून आली. त्यातून सरकारी रुग्णालयात यापुढे मोफत उपचार बंद अशी माहिती समोर आली.  यावरून बराच वाद उभा राहिला. ग्रामीण भागातील लोक आजही मोठ्या प्रमाणात सरकारी रुग्णालयाचा लाभ घेतात. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यातील गोरगरिब जनता आणि गरजू रुग्णांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर तातडीने या प्रकाराची दखल सार्वजनिक विभागाकडून घेण्यात आली. त्यानंतर अनवधानाने हे दर छापल्याची कबुली शासनाने दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंत हे दर लागू होणार होते. त्यात केसपेपरसाठी ५ रुपये ते सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ४० हजारांचे शुल्क आकारण्यात येणार होते. २०२३ साली तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्वच आरोग्य विभागाच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातील असा धाडसी निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाली. तेव्हापासून सर्व राज्यात मोफत उपचार सुरू होते. मात्र निवडणुका संपल्यानंतर पुन्हा सरकारने दर लागू केले की काय असा प्रश्न नागरिकांना पडला होता. परंतु सरकारने त्यांची चूक कबूल करत सरकारी रुग्णालयातील उपचार निःशुल्क असतील असं स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Government U-Turn: Free treatment continues in public hospitals.

Web Summary : Maharashtra government retracts hospital fee order, admitting error. Free treatment continues in public hospitals, clarifying earlier confusion caused by mistakenly published rates. Public Health Department rectified the issue.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीhospitalहॉस्पिटल