शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

कोस्टल रोड प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 19, 2016 01:15 IST

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीजीएम) भू-तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदील दाखविला आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी भाजपाच्या

मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीजीएम) भू-तांत्रिक सर्वेक्षणाला हिरवा कंदील दाखविला आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी भाजपाच्या या महत्त्वाकांक्षी सागरी मार्गाचा म्हणजेच कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे़ पावसाळ्यानंतर लगेचच या कामाला सुरुवात होणार आहे़नरिमन पॉइंट ते कांदिवली असा ३३ किलोमीटर सागरी मार्ग तयार करण्याचा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे़ पर्यावरण खात्याकडून विविध परवानग्यांच्या प्रतीक्षेत हा प्रकल्प लांबणीवर पडला़ परिणामी या प्रकल्पाचा खर्च आता तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचला आहे़ त्यामुळे पालिकेने भू-तांत्रिक सर्वेक्षणासाठी परवानगी मिळण्यापूर्वीच गेल्या महिन्यात सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा मागविला होत्या़मात्र गेल्याच आठवड्यात एमसीजीएमने आवश्यक सर्व परवानगी दिल्यामुळे आॅक्टोबरपासून कोस्टल रोडच्या कामाचा श्रीगणेशा होऊ शकेल़ पहिल्या टप्प्यात मरिन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे येथील कार्टर रोडपर्यंतच्या कामाला सुरुवात होणार आहे़ भू-तांत्रिक सर्वेक्षणाबरोबर या प्रकल्पात रस दाखविणाऱ्या कंपन्याही बोलाविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)ठेकेदारांची परिषदकोस्टल रोड हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याने पालिकेने नुकतीच एक परिषद आयोजित केली होती़ यामध्ये ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता़ तसेच त्यांच्याकडून या प्रकल्पाचा आराखडा तयार करुन त्याची चाचपणी सल्लागारांकडून करून घेण्यात येणार आहे़़कोंडीमुळे मुंबईकर हैराणवाहतूककोंडीमुळे पश्चिम उपनगरातून शहराकडे जाण्यास एक ते दीड तास लागतो़ सागरी मार्गाच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी हा प्रकल्प सुचविण्यात आला आहे़ त्यानुसार नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत ३३ किलोमीटरचा सागरी मार्ग उभारण्यात येणार आहे़१६० हेक्टर्सचा भरावसागरी मार्गासाठी समुद्रात १६० हेक्टर्स भराव टाकण्यात येणार आहे़ यापूर्वी केवळ बंदर बांधण्यासाठी अशा प्रकारचे भराव टाकण्याची परवानगी देण्यात येत होती़ मात्र रस्त्यासाठी समुद्रात भरणी टाकण्याची परवानगी मिळालेली मुंबई महापालिका ही देशातील पहिली पालिका ठरणार आहे़