आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:41 IST2025-07-01T14:40:40+5:302025-07-01T14:41:47+5:30

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये असलेल्या आणि येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत असेल, अशी घोषणा केली. 

Free food for all ST employees coming for passenger service on Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 

भूवैकुंठ असलेल्या पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी येतात. वारकऱ्यांना पंढरपूरपर्यंत पोहोचण्यासाठी एसटी महामंडळानेकडून अधिक बस चालवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आषाढी एकादशी निमित्ताने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पंढरपूरला बसेस घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था असणार आहे. राज्याचे परिवहन आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची माहिती दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

सरनाईक म्हणाले, "गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत. ऊन, वारा पाऊस याची तमा न बळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात यंदा स्वखर्चाने सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे. या निमित्ताने माणसातील विठुरायाची सेवा करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम राबविणार आहे", असे सरनाईक यांनी सांगितले.

आषाढी वारीच्या काळात ५,६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील.

आरक्षण करणाऱ्यांना १५ टक्के सवलत

एसटी महामंडळाने लांब आणि मध्यम अंतरावरील प्रवासासाठी आधीच आरक्षण करणाऱ्यांना दिलासा दिला आहे. एसटीने आधीच आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्य शासनाच्या प्रवासी सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्यांना ही सवलत नसणार आहे. ही योजना १ जुलैपासून सुरू करण्यात आली असून, पुढील वर्षभर राहणार आहे. 

Web Title: Free food for all ST employees coming for passenger service on Ashadhi Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.