शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हे तर फसवणूक करणारे सरकार !

By admin | Updated: October 30, 2015 01:22 IST

राज्यातील फडणवीस सरकार हे ‘फसवणूक’ सरकार असून जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली

मुंबई : राज्यातील फडणवीस सरकार हे ‘फसवणूक’ सरकार असून जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या १० महिन्यांतच या सरकारने राज्यावर ५४ हजार कोटींचे कर्ज लादले. वृत्तपत्रांच्या मथळ्यात राहण्यात धन्यता मानत असलेले हे सरकार, जनतेच्या मनातून सपशेल उतरले आहे, असेही मुंडे म्हणाले.शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील युती सरकारच्या वर्षभरातील कारभारावर टीका केली. सरकारने ३ हजार ७०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. पावसाळी अधिवेशनात १४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. दुष्काळाच्या नावावर पेट्रोल, डिझेलची करवाढ करून १६०० कोटींची अधिकची करवसुली लादली. नदी नियमन धोरण लोकाभिमुख करण्याचे आश्वासन ठरावीक उद्योजकांच्या फायद्यासाठी पहिल्या वर्षीच रद्द केले. रद्द केलेले धोरण पुन्हा लागू करण्याची नामुष्की राष्ट्रीय हरीत लवादाच्या २७ आॅक्टोबरच्या निर्णयामुळे सरकारवर आली, असे मुंडे म्हणाले.सरकारने राज्य कृषिमूल्य आयोगाची नऊ महिन्यांपूर्वी स्थापना केली, परंतु या नऊ महिन्यांत आयोगावर सदस्य नेमले नाहीत की, आयोगाची एकही बैठक झाली नाही. जे सरकार आयोगाचे सदस्य नेमू शकत नाही, ते कृषिमालाला रास्त भाव काय देणार, असा सवालही मुंडे यांनी केला. ‘अच्छे दिन’च येणार सांगून सत्ता मिळवलेल्या सरकारने जनतेला ‘बुरे दिन’ दाखवले आहेत. ‘अब की बार.. भाजप सरकार..’ ही घोषणा ‘अब की बार... डान्स बार’ मध्ये बदलल्याचेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)