शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

अशी ही बनवा बनवी... व्यक्ती एक ; नोकरी मात्र दोन सरकारी संस्थांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 7:04 PM

एका संस्थेत कायम स्वरूपी नोकरी करत असताना, दुसऱ्या संस्थेला त्याबद्दल माहिती न देता, चुकीची माहिती देवून त्याने शासनाचा दोन्ही संस्थांकडील पगार घेत शासनाची त्यांनी फसवणूक केली.

ठळक मुद्देसंस्थाचालकांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत शासनाची त्याने २२ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक

 पिंपरी : काळेवाडीतील भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यालयात लिपिक पदावर कायमस्वरूपी नोकरी करत असलेल्या आरोपीने पुण्यातील पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक शाळेतही नोकरी मिळवली. एकाचवेळी दोन्हीकडे सेवेत राहुन त्याने पगाराच्या रकमेपोटी २२ लाख ७५ हजार २२५ रुपये मिळवले. शासनाची त्यांनी फसवणूक केली. या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षणअधिकारी पराग एकनाथ मुंडे यांनी पोलिसांकडे संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांविरूद्ध फिर्याद दाखल केली होती. वाकड पोलिसांनी भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांच्यासह दहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर या संस्थेचे महेंद्र बामगुडे (लिपीक), रविंद्र बामगुडे, नवनाथ देवकर (प्रभारी मुख्याध्यापक), संगीता पाटोळे , नवनाथ देवकर, उल्का जगदाळे, जयश्री पवार, रामदास जाधव, संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर अशी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. या बाबतची सविस्तर माहिती अशी, प्रमुख आरोपी रविंंद्र नामदेव बामगुडे हा महेंद्र नामदेव बामगुडे नावाने भाऊसाहेब तापकीर विद्यालय काळेवाडी येथे लिपीक पदावर कायम स्वरूपी नोकरीस असताना त्याने पाषाण येथील संजय निम्हण प्राथमिक विद्यालय महापालिका शाळेत सेवक पदावर नोकरी मिळवली. एका संस्थेत कायम स्वरूपी नोकरी करत असताना, दुसऱ्या संस्थेला त्याबद्दल माहिती न देता, चुकीची माहिती देवून त्याने शासनाचा दोन्ही संस्थांकडील पगार घेतला. ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत शासनाची त्याने २२ लाख ७५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. ही बाब निदर्शनास आली. भाऊसाहेब तापकीर विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब तापकीर, सचिव मल्हारी तापकीर तसेच तत्कालिन प्रभारी मुख्याध्यापक  नवनाथ रामदास देवकर, उल्का रणजीत जगदाळे तसेच संगीता पाटोळे, जयश्री पवार यांना ही बाब माहित असूनही त्यांनी ती लपवली. शासनाला वेळीच माहिती देण्याचे टाळले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSchoolशाळाGovernmentसरकार