शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

चारही नगरसेवक झाले ‘भूमिगत’!

By admin | Updated: October 29, 2015 01:22 IST

प्रख्यात बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात असलेले विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे हे चौघेही नगरसेवक ‘भूमिगत’ झाले आहेत

ठाणे : प्रख्यात बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात असलेले विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे हे चौघेही नगरसेवक ‘भूमिगत’ झाले आहेत. तर ठाणे न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन देण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक का केली नाही, असा सवाल राजकीय तसेच पोलीस वर्तुळात केला जात आहे.सुधाकर चव्हाण यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी २९ आॅक्टोबर तर विक्रांत, नजीब आणि जगदाळे या उर्वरित तिघांच्या अर्जांची सुनावणी ३१ रोजी ठाणे न्यायालयात होणार आहे. या चौघांनाही तात्पुरता जामीन देण्यास न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटकेचे संकेत पोलिसांनी दिले होते. या चौघांना न्यायालयाने कोणतेही संरक्षण दिले नसताना ते भूमिगत होईपर्यंत पोलिसांनी वाट का पाहिली, असा संतप्त सवाल केला जात आहे. कासारवडवली पोलिसांची तीन तर गुन्हे अन्वेषण विभागाची तीन अशी सहा पथके या नगरसेवकांच्या मागावर असल्याचे पोलीस सांगत आहेत. जगदाळे यांच्या लोकमान्यनगर येथील घरीही एक पथक दोन वेळा जाऊन आले. तर सुधाकर चव्हाणांच्या शिवाईनगर येथील ‘मंत्रांजली’ निवासस्थानी तसेच मुल्ला यांच्या राबोडीतील कार्यालयात आणि विक्रांत चव्हाण यांच्या वर्तकनगर येथील कार्यालयातही ही पथके गेली होती. मात्र चौघांपैकी कोणीही त्यांच्या हाती लागले नाही. या चौघांचेही मोबाइल नॉट रिचेबल आहेत. त्यांचे नातेवाईक आणि अन्य संबंधित राजकीय नेत्यांकडेही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताला...पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण आणि उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे हे कल्याण-डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेकरिता बंदोबस्ताला गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. तपास अधिकारी दिलीप गोरे यांचाही फोन नॉट रिचेबल होता. तर, जनसंपर्क अधिकारी गजानन काब्दुले यांनी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, असे सांगितले.कार्यालयांमध्ये शुकशुकाट...एरव्ही, वर्तकनगर येथील विक्रांत चव्हाण, शिवाईनगर येथील सुधाकर चव्हाण तर लोकमान्यनगर येथील जगदाळे यांच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि नागरिकांची गजबज असते. बुधवारी या ठिकाणी कमालीची शांतता आणि शुकशुकाट पाहायला मिळाला. तर, मुल्ला यांच्या राबोडीतील कार्यालयात गर्दी होती. पण, त्यांच्याबाबत कोणीही बोलण्यास तयार नव्हते. (प्रतिनिधी)