शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: सोनिया गांधी यांचा हिरवा कंदील; सरकारचा फॉर्म्युला आज ठरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:15 IST

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची आज चर्चा; शिवसेनेशीही होणार सल्लामसलत

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मवाळ भूमिका घेत, आपले मौन सोडले असून, आपल्या पक्षाच्या नेत्यांना फॉर्म्युल्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करायला सांगितले आहे. ही चर्चाबुधवारीच होणार असून, आता लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मंगळवारी होणारी बैठक इंदिरा गांधी जयंतीच्या कार्यक्रमांमुळे रद्द झाली. मात्र, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल व के. सी. वेणुगोपाल यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याच्या विविध शक्यतांवर त्यांच्याच चर्चा झाली, तसेच आपण शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा न दिल्यास काँग्रेसचे आमदार बाहेर पडतील, अशी शक्यताही या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केली. त्यानंतरच, सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे सांगण्यात आले. दोन्ही काँग्रेसच्या उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या नेत्यांशीही चर्चा होणार आहे. त्यात फॉर्म्युला नक्की झाल्यावर सरकार स्थापनेबद्दल अधिकृत घोषणा केली जाईल.शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही सोनिया गांधी यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली. हिंदुत्वापेक्षा मराठी माणसाचे हक्क ही शिवसेनेची मूळ भूमिका आहे आणि ती आपल्या विचारसरणीच्या आड येणार नाही, असे या नेत्यांनी त्यांना सांगितले, तसेच एकदा किमान समान कार्यक्रम नक्की केल्यानंतर या अडचणी राहणार नाहीत, असे या नेत्यांचे म्हणणे होते. ए. के. अँथनी, के. सी. वेणुगोपाल आदी नेत्यांचा बिगरमराठी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेसोबत जाण्यास विरोध आहे, पण ती भूमिका आता कालबाह्य ठरल्याचे नेत्यांनी सोनिया गांधी यांना पटवून सांगितले.सरकार आमचेच - संजय राऊतशिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले की, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट झालेले असेल. शरद पवार यांच्या वक्तव्यांमुळे निरनिराळे अर्थ लावले जात असल्याकडे लक्ष वेधता ते म्हणाले की, पवारसाहेबांना समजण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेविषयी कोणी चिंता करण्याचे कारण नाही. कारण आम्ही सरकार स्थापन करणारच.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधी