माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 19:34 IST2023-06-12T19:26:58+5:302023-06-12T19:34:04+5:30

मनोहर जोशी यांना 22 मे रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Former Maharashtra Chief Minister Manohar Joshi's condition improved, he was discharged from the hospital | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना 22 मे रोजी अचानक तब्येत खालावल्यामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती थोडी गंभीर होती, पण नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आता आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हिंदुजा रुग्णालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने आज त्यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनोहर जोशी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने 22 मी रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तिथे आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती थोडी गंभीर होती. पण उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने, त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आणि आज सायंकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title: Former Maharashtra Chief Minister Manohar Joshi's condition improved, he was discharged from the hospital