शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जिल्हा परिषद शाळेचे रूप पालटले

By admin | Updated: March 3, 2017 01:25 IST

हातवळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रूप पालटलेले आहे.

वरवंड : हातवळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रूप पालटलेले आहे. जिल्हा परिषद शाळा आदर्श ठरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. इंग्लिश मीडियम शाळेतून विद्यार्थी येऊन जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहेत. इंग्लिश मीडियम शाळेच्या पावलावर पाऊ ल ठेवत जिल्हा परिषद शाळा हायटेक होताना दिसत आहे. लोकांचा असा समज असायचा, की जिल्हा परिषद शाळा म्हणजे जुन्या पडक्या खोल्या अशा स्वरूप असणाऱ्या शाळा तसेच रंग नसलेली भिंत असे चित्र लोकांसमोर उभे राहायचे, मात्र हातवळण येथील हा जिल्हा परिषद शाळेचा चेहरा बदलण्याचे काम येथील ग्रामस्थांनी मिळून केले आहे. तसेच शाळेतील १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांचे संविधान तोंडपाठ आहे. तसेच विद्यार्थ्यांना इग्रजी माध्यमाप्रमाणे ड्रेसही देण्यात आला आहे. हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा बदल करण्यामागे गावातील लोकांचा मोठा सहभाग पाहावयास मिळत आहे. यामुळे लोकांनी दाखवलेला सहभाग या शाळेला नवे रूप देण्यास यशस्वी झाले आहे. याचबरोबर या हातवळण येथील ग्रामस्थांनी शाळेसाठी आर्थिक योगदान दिले आहे. या शाळेमध्ये वेळोवेळी केंद्रप्रमुख वसंत कुतवळण यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेसाठी सरपंच चैताली बनकर, उपसरपंच रमेश जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सागर फडके, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मंगेश फडके, दशरथ सरडे, मयूर फडके, चंद्रकांत शितोळे, हातवळण ग्रामपंचायत व शिक्षक सोमनाथ बडे, नराळे, संकपाळ, घोरपडे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत.(वार्ताहर) >या ग्रामस्थांनी शाळेसाठी शाळेतील वर्गखोलीतील फरशी, पाणी पिण्यासाठी पाण्याचे जार, साहित्य ठेवण्यासाठी कपाट, क्रीडासाहित्य, पुस्तके, तसेच रंगकामासाठी चौदाव्या वित्त आयोगातून आर्थिक मदत, तसेच कमी पडलेल्या निधीसाठी रंगकामासाठी लोकवर्गणीतून काम पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे, स्पीकर्स, प्रिटंर, शाळेतील मैदानामध्ये सुशोभीकरण केले आहे. तसेच शाळेमध्ये बाग व त्याचे सुशोभीकरण करणे, क्रीडांगण, प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर करण्याचा मानस असल्याचे मुख्याध्यापक वसंत भोसले यांनी सांगितले. तसेच शाळा सिद्धी योजनेअंतर्गत ‘अ’ दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे.