संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 08:48 AM2023-11-26T08:48:08+5:302023-11-26T08:50:51+5:30

S. Jaishankar : ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले.

Foreign Minister should look at culture and history with an open eye. S. Jaishankar's statement | संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान

संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान

पुणे -  ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी देशाच्या धोरणात्मक संस्कृती-जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांबाबत विचार मांडले.

‘आपण यापूर्वी न स्वीकारलेले वेगवेगळे मार्ग स्वीकारले पाहिजेत. भूतकाळात पर्याय आणि विचार प्रक्रिया अस्तित्वात होती. पण आता आपल्या स्वतःच्या नोंदींचे गंभीरपणे परीक्षण करणे आवश्यक आहे. अनेकविध संकल्पना आपल्या संस्कृतीत आहेत, पण आपण त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे,’ असेही एस. जयशंकर म्हणाले. 

  डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, ‘परराष्ट्र धोरणासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण महत्त्वाची आहे. यात पुण्यासह सिम्बायोसिस महत्त्वाचे योगदान देत आहे.’ यावेळी कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण आणि डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

परराष्ट्रीय धोरण अनियंत्रित घटकांवर अवलंबून
एस. जयशंकर म्हणाले, ‘परराष्ट्रीय धोरण हे अनेक अनियंत्रित घटकांवर अवलंबून असते म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्याही देशाला कालबद्ध तसेच योजनाबद्ध असे आखीव धोरण ठरविणे शक्य नसते. या दृष्टीतून परराष्ट्रीय धोरणाची तुलना स्वयंचलित जहाजापेक्षा नौकानयनाशी करता येण्यासारखी आहे. अर्थात, परराष्ट्रीय धोरण परिणामकारक होण्यासाठी त्यात एकसूत्रता आणि लवचिकपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात.’

Web Title: Foreign Minister should look at culture and history with an open eye. S. Jaishankar's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.