शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 08:40 IST

Beed Crime News: गेल्या वर्षभरापासून कुठल्या ना कुठल्या गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमधील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेल्या वर्षभरापासून कुठल्या ना कुठल्या गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमधील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर छेडछाड आणि लैंगिक शोषण प्रकरणी दोन शिक्षकांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी आरोपी शिक्षकांची नावं असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीमधून मिळालेल्या अधिक माहितीनुसार हा धक्कादायक प्रकार ३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या काळात सातत्याने घडला. पीडित अल्पवयीन मुलगी ही नीट परीक्षेच्या अभ्यासासाठी बीडमधील उमाकिरण कोचिंग क्लासेस या खाजगी कोचिंग क्लासमध्ये जात असे. तिथे आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी तिच्यासोबत छेडछाड करून तिचं लैंगिक शोषण केलं. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रशांत खाटोकर याने गतवर्षी जुलै महिन्यांपासून तिच्या लैंगिक छळास सुरुवात केली. प्रशांत खाटोकर हा पीडित मुलगी वर्गातून सुटल्यावर  रस्त्यावर जाऊन थांबायचा. तसेच तिला आपल्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती करायचा. एवढंच नाही तर कधी कधी क्लास संपल्यावर तो या मुलीला केबिनमध्ये बोलवायचा. तसेच कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करायचा. त्यानंतर तिच्या शरीराला स्पर्श करायचा, तसेच याबाबत घरी सांगितल्यास जिवे मारेन अशी धमकी द्यायचा, असा आरोप पीडितेने केला आहे. एवढंच नाही तर आरोपींनी आपले अश्लील फोटोही काढल्याचे पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, पीडित मुलीने या प्रकाराबाबत दुसरा शिक्षक असलेल्या विजय पवार याला माहिती दिल्यानंतर त्यानेही तिची मदत न करता तिचं शोषण केलं. विजय पवार हा सुद्धा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. एकटीला बोलावून घ्यायचा, त्यामुळे इतर विद्यार्थीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहायचे असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या सर्व छळाला कंटाळून पीडित मुलगी ही मानसिक तणावाखाली गेली. मुलीच्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे तिच्या कुटुंबीयांनी विचारणा केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत वडिलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचंही राजकीय कनेक्शन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याSexual abuseलैंगिक शोषणStudentविद्यार्थीTeacherशिक्षक