Gadchiroli: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील 'या' गावात धावली बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 11:18 IST2025-07-17T11:17:46+5:302025-07-17T11:18:21+5:30

Gadchiroli ST Bus Service: या सेवेचा गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे १ हजार २०० हून अधिक प्रवाशांना फायदा होणार आहे.

For the first time since independence, buses will run in this village in Maharashtra, the villagers are overjoyed! | Gadchiroli: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील 'या' गावात धावली बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात!

Gadchiroli: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील 'या' गावात धावली बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात!

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील मारकनार गावात सरकारी बस सेवा सुरू झाली, जे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते. गावात पहिल्यांदा बस पोहोचल्यानंतर गावलकऱ्यांनी राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला. या सेवेचा फायदा आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे १२०० हून अधिक रहिवाशांना होईल.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम मारकनार गावातून अहेरीपर्यंत बस सेवा सुरू झाली, याचे श्रेय गडचिरोली पोलिसांना दिले जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अबुझमदच्या पायथ्याशी असलेले मारकनार गाव हे गाव नक्षलवाद्यांचे केंद्र होते. स्वातंत्र्यापासून या गावात बस धावली नाही, त्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या पुढाकाराने या गावात बस सेवा सुरु करण्यात आली. बुधवारी गावात बस पाहून गावकरी गावकऱ्यांना मोठा आनंद झाला. राज्य परिवहन सेवेचे स्वागत करण्यासाठी गावकरी तिरंगा घेऊन जमले. या सेवेचा फायदा  मारकनार, मुरुंभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयरकोठी आणि गुंडुरवाही यासारख्या गावांतील १,२०० हून अधिक रहिवाशांना होईल.

दुर्गम भागात वाहतूक सुलभ करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले. १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गरदेवाडा-वांगेटुरी मार्गावर आणि २७ एप्रिल रोजी काटेझर ते गडचिरोली बससेवा सुरू करण्यात आली, असे सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या संरक्षणाखाली जिल्ह्यात ४२०.९५ किमी लांबीचे २० रस्ते आणि ६० पूल बांधण्यात आले, अशीही माहिती आहे.

Web Title: For the first time since independence, buses will run in this village in Maharashtra, the villagers are overjoyed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.