शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही जयंत पाटलांना विजयाचा विश्वास; पक्षासाठी विधानपरिषदेत जाणे महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:47 IST

अलिबागचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे

अलिबाग - शेतकरी भवनातून राज्याचा मुख्यमंत्री निवडण्याची भाषा करणाऱ्या शेकापचे जयंत पाटील यांना या राजकीय परिस्थितीमुळे विधानपरिषद निवडणूक ही आव्हानात्मक ठरणार अशी चर्चा आहे. उद्धव सेनेच्या मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी अडचणीची ठरणार आहे. मात्र जयंत पाटील यांना आपल्या विजयाची खात्री आहे. विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी महाविकास आघाडीकडून तीन तर महायुतीकडून नऊ आणि अपक्ष दोन असे १४ उमेदवार रिंगणात आहेत.

अलिबागचे शेकापचे आमदार जयंत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे. मात्र ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीकडे दोन आमदार निवडून येण्याची ताकद आहे. मात्र तिसऱ्या उमेदवारासाठी कसरत करावी लागणार आहे. 

शेकापची ताकद कमीजयंत पाटील यांनी माझी ही शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले आहे. सध्या रायगडात शेकापची ताकद कमी झाली आहे. विधानसभेत त्यांचा एकच आमदार आहे. पक्षाची झालेली ही पिछेहाट रोखण्यासाठी जयंत पाटील यांना विधानपरिषदेत आमदार होणे पक्षाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अति महत्वाचे आहे.  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची निवडून आणण्याची जबाबदारी जयंत पाटील यांनी घेतली होती. मात्र त्यांचा करिश्मा चालला नाही. त्यामुळे ठाकरे सेनेत नाराजीचा सूर आहे. 

विधानपरिषद निवडणूक ही महाविकास आघाडीतून लढवत आहे. महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिले आहेत. तीनही उमेदवार विजयी होणार आहेत. आमच्याकडे ७१ मते असून ६९ मतांची गरज आहे. त्यामुळे आम्ही आमचा कोटा पूर्ण करून तिघांना विजयी करणार.- जयंत पाटील, आमदार, शेकाप

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Jayant Patilजयंत पाटीलMilind Narvekarमिलिंद नार्वेकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी