CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असलेले अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या दुःखद घटनेचा आदर राखत आणि आपल्या मित्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या आपल्या सर्व २२ जाहीर सभा फडणवीसांनी रद्द केल्या आहेत.
विमान अपघातात काळाचा घाला
निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी होण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी जवळ असताना त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत विमानातील कोणालाही वाचवता आले नाही. राजकारणातील एक कर्तबगार नेतृत्व हरपल्याने सर्वांनाच धक्का बसला.
देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची राजकीय मैत्री सर्वांनाच परिचयाची आहे. दादांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री भावूक झाले."अजितदादांसारखा धडाडीचा नेता आणि सडेतोड मित्र गमावणे ही माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
याच पार्श्वभूमीवर ७ दिवसांत होणाऱ्या २२ सभा रद्द करून फडणवीसांनी आता कोणत्याही प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीची धुरा आता स्थानिक नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीसांनी सर्व सभा रद्द केल्या आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
सुनेत्रा पवार यांचा शपथविधी
अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. मात्र, या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले असले तरी अजितदादांकडील महत्त्वाचे अर्थखाते अद्याप सोपवण्यात आलेले नाही. शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देवगिरीवर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीवरही या घटनेचा परिणाम झाला आहे. राज्यात जाहीर झालेल्या ३ दिवसांच्या शासकीय दुखवट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख बदलली आहे. आता ५ फेब्रुवारीऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान होईल, तर ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाईल.
Web Summary : Following Ajit Pawar's tragic death, CM Fadnavis cancelled 22 rallies as a mark of respect. He expressed deep personal loss, emphasizing their political friendship. Sunetra Pawar took oath as Deputy CM. Election dates were postponed due to state mourning.
Web Summary : अजित पवार के दुखद निधन के बाद, मुख्यमंत्री फडणवीस ने सम्मान के तौर पर 22 रैलियाँ रद्द कर दीं। उन्होंने अपनी राजनीतिक दोस्ती पर जोर देते हुए गहरी व्यक्तिगत हानि व्यक्त की। सुनेत्रा पवार ने उपमुख्यमंत्री पद की शपथ ली। राजकीय शोक के कारण चुनाव की तारीखें स्थगित कर दी गईं।