शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

पंतप्रधान आवास योजनेचा फज्जा; ११ लाख ७४ हजारांपैकी फक्त ३६ हजार घरे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 3:49 AM

गृहनिर्माणाचे इमले केवळ कागदावरच

- संदीप शिंदे मुंबई : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ३९० शहरांमध्ये २०२२ सालापर्यंत १९ लाख ४० हजार घरबांधणीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. महाराष्ट्रात ११ लाख ७४ हजार घरांचे प्रस्ताव मंजूर झाल्याचा देखावाही उभा राहिला. मात्र, आजवर त्यापैकी फक्त ३६ हजार घरांचा ताबा लाभार्थ्यांना मिळाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. तब्बल ९ लाख ९५ हजार घरांचे प्रस्ताव आजही कागदावरच आहेत. उर्वरित २ लाख ९ हजार घरांची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात असून त्यांच्या मार्गातही अनेक अडथळे आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून २०२२पर्यंत देशातील प्रत्येकाला घर देण्यासाठी ही योजना जाहीर केली होती. महाराष्ट्रात योजनेच्या अंमलबजावणीसाठी ९ डिसेंबर, २०१५ रोजी शासन निर्णय झाला. केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने (सीएसएमसी) १,००८ योजना मंजूर करून ३९० शहरांमध्ये ११ लाख ७४ हजार ५९१ घरे उभारणीचा निर्णय घेतला. त्यापैकी ९ लाख ९१ हजार ९३६ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असतील असे सांगण्यात आले होते. या स्वप्नपूर्तीची जबाबदारी म्हाडाकडे सोपविण्यात आलेली आहे. २०१७-१८ (१० टक्के), २०१८-१९ (२० टक्के), २०१९-२० (२० टक्के) 

२०२०-२१ (२० टक्के ) आणि २०२१-२२ (३० टक्के) अशी उद्दिष्टपूर्ती करायची होती. त्यानुसार मार्च, २०२० अखेरीपर्यंत किमान ५ लाख ८७ घरांची उभारणी अपेक्षित होती. मात्र, त्यापैकी फक्त ३ टक्के उद्दिष्टच साध्य झाले आहे. मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर यांसारख्या शहरांमध्ये तर या योजनेतील एकही घर उभे राहू शकलेले नाही.सीएलएसएसचे लाभार्थीया योजनेच्या चार घटकांपैकी कर्ज संलग्न व्याज अनुदान (सीएलएसएस) या घटकाअंतर्गत तीन लाखांपर्यंत आणि तीन ते सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना सहा लाखांपर्यंतचे कर्ज साडेसहा टक्के व्याजदराने दिले जाते. १ लाख ८४ हजार २१३ जणांनी त्याचा फायदा घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. त्याशिवाय ही घरे सरकारी यंत्रणांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सरकारी यंत्रणांना त्याचे श्रेय घेता येत नाही.

या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर ती आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य ठरतील अशा पद्धतीने नियोजन व्हायला हवे. त्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यायला हवी. म्हाडाने केवळ समन्वयक न राहता प्रत्यक्ष गृहनिर्माण करायला हवे. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत.- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

उद्दिष्ट साध्य करूराज्यातील प्रमुख शहरांमध्ये योजना मंजूर झाल्या असून अनेक ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहेत. मोठ्या शहरांमध्ये जागा मिळविताना अडचणी येत असल्या तरी त्यातून मार्ग काढला जाईल. मंजूर प्रकल्पातील जास्तीत जास्त कामे पूर्ण करून उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.मिलिंद म्हैसकर, सीईओ, म्हाडाफक्त ५ टक्के निधी वितरितमहाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून १,०५,६३३ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यापैकी फक्त १८ हजार ३१२ कोटी रुपये मंजूर झाले असून ५ हजार ६६६ कोटी रुपयेच प्रत्यक्ष वितरित झाल्याचे केंद्र सरकारच्या वेबसाइटवर दिसते. त्यात पूर्ण झालेली घरे, प्रगतीपथावरील घरे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या अनुदानाचा समावेश आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना