शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

‘सुप्रीम’ सुनावणीवर लक्ष!, एकनाथ शिंदे सरकारच्या भवितव्याचा आज फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 05:30 IST

शिवसेनेने केलेल्या याचिकांवर  सुप्रीम काेर्टात हाेणार सुनावणी

राज्यातील एकनाथ शिंदे-भाजप सरकारच्या भवितव्याशी संबंधित विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० दिवसांच्या सरकारविरोधात शिवसेनेने याचिका केल्याने सरकारवर असलेली कायदेविषयक टांगती तलवार दूर होते की कायम राहते, याचा फैसला सोमावारी होईल. कोर्टाकडून नेमका कुणाला दिलासा मिळतो आणि कुणाला दणका, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना दिलेली अपात्रतेची नोटीस व त्याला शिंदे गटाने दिलेले आव्हान, शिंदे यांना सरकार स्थापनेचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेले आमंत्रण व अध्यक्षांच्या निवडीला दिलेली परवानगी घटनाबाह्य असल्याची ठाकरे गटाची याचिका तसेच ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेबाबतची शिंदे गटाची याचिका यावर एकत्रित सुनावणी होईल. असेही म्हटले जाते की कोर्टात सर्व याचिकांवर अंतिम फैसला लगेच होणार नाही.

सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी दिलेले आमंत्रण व नंतर हे सरकार अस्तित्वात आणणे हे सगळे असंवैधानिक असून, राज्यपालांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करत ठाकरे गटाने याचिका दाखल केली. विश्वासदर्शक ठरावावेळी अपात्रतेची नोटीस मिळालेल्या १६ आमदारांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी याचिका ठाकरे गटाने केली होती. पण त्यावर ११ जुलैला सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. 

विधिमंडळातील पक्ष नेमका कुणाचा?

  • शिंदे हे २०१९पासून शिवसेनेचे गटनेते होते. त्यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकवले. 
  • या गटाचे नेते म्हणून शिंदेच कायम असून, आपला गट हाच विधिमंडळ शिवसेना पक्ष असल्याचा त्यांचा दावा आहे. या गटाने भरत गोगावले यांची विधानसभेतील आपले प्रतोद म्हणून नियुक्ती केली. 
  • दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने शिंदे यांना गटनेते पदावरून हटविले आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती केली. दोन्ही गटांनी या विषयावर काेर्टात धाव घेतली आहे. 
  • शिंदे सरकारला उद्याच्या सुनावणीत दिलासा मिळाला तर सरकारला स्थैर्य लाभेल आणि राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होईल. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ३० जून रोजी घेतली होती. 

याचिका निकालात काढा, विधानमंडळाची विनंतीसदस्यांच्या पात्र-अपात्रतेचे अधिकार हे कायद्यानुसार विधानसभा अध्यक्षांना आहेत. राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांनी अध्यक्ष म्हणून निवडले आहे. त्यामुळे हे अधिकार अध्यक्षांकडे देऊन सुप्रीम कोर्टाने सदस्यांच्या पात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिका निकाली काढाव्यात, असा विनंती अर्ज विधानमंडळ सचिवालयाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, हेही महत्त्वाचे असेल. 

‘ते’ अधिकार घटनात्मकदोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आधी विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, त्यानंतर त्या निर्णयाला आव्हान देता येऊ शकेल, असे कोर्ट सुनावणीत सांगण्याची शक्यता आहे. शिंदे सरकारला विश्वासदर्शक ठरावासाठी राज्यपालांनी दिलेली परवानगी आणि अध्यक्षांच्या निवडीला दिलेली परवानगी हा राज्यपालांचा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांवर ठाकरे गटाला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.अनंत कळसे, माजी प्रधान सचिव, विधानमंडळ

अंदाज बांधणे कठीणनिकालाचा अंदाज करणे अवघड आहे. दोन्ही गटांनी परस्परांविरोधात दावे केले आहेत. त्यांच्या सुनावण्या आणि निकालही प्रलंबित ठेवून सर्व राजकीय घडामोडी झाल्या आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षातून बाहेर पडलेल्या गटाने दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात विलीन होणे किंवा स्वत:ला ओळख करून घेणे गरजेचे आहे. या गटाने तसे काहीही केलेले नाही. तिथेच ते अपात्र ठरतात. राज्यपालांनी अधिवेशन कसे बोलवायचे याबाबत घटनेत स्पष्टता आहे. त्याचे पालन झाले आहे, असे दिसत नाही.    प्रा. उल्हास बापट, घटनातज्ज्ञ

सुनावणीबाबत अनिश्चितताकोर्टात सोमवारी सुनावणी होईल की पुढची तारीख सुनावणीसाठी दिली जाईल याबाबत अनिश्चितता आहे. सदस्य अपात्रतेबाबत अध्यक्षांना अधिकार असल्याचा दावा विधानमंडळ सचिवालयातर्फे केल्याने आता त्याविषयी उद्धव ठाकरे गटाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला जाईल. त्यामुळे सुनावणी लांबणीवरही पडू शकते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ