शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

Flood: मानवी चुका, अलमट्टीचा महापुराशी संबंध नाही; पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 7:28 AM

व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास त्यांच्या पुनर्वसनासाठीही शासन प्रयत्नशील आहे. पुराचा फटका बसलेल्या संपूर्ण भागाचा आढावा घेतल्यानंतर दोन दिवसांत मदतीबाबत घोषणा करण्यात येईल

ठळक मुद्देपाण्याचा विसर्ग व त्याचा फुगवटा होणार नाही यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करत होता. अलमट्टीमधून विसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.एनडीआरएफच्या धर्तीवर एक तुकडी करून तिचे केंद्र कराड येथे करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू

सांगली : सांगली, कोल्हापूरला बसलेला महापुराचा फटका आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा फुगवटा याचा काहीही संबंध नाही. यात मानवी चुकाही झालेल्या नाहीत. शंभर वर्षांत झाला नाही इतका पाऊस एकावेळी कोयना, नवजा परिसरात झाला. या विक्रमी पावसाची जबर किंमत आपल्याला मोजावी लागली, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली. शेतकरी, व्यापाऱ्यांसह सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी पूरग्रस्तांच्या भेटीदरम्यान दिला. सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार सोमवारी जिल्हा दौऱ्यावर होते. पवार म्हणाले, पाण्याचा विसर्ग व त्याचा फुगवटा होणार नाही यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करत होता. अगदी अलमट्टीमधून विसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास त्यांच्या पुनर्वसनासाठीही शासन प्रयत्नशील आहे. पुराचा फटका बसलेल्या संपूर्ण भागाचा आढावा घेतल्यानंतर दोन दिवसांत मदतीबाबत घोषणा करण्यात येईल.

पूरग्रस्त नागरिक, व्यापाऱ्यांना दिलासा

अजित पवारांनी जिल्ह्यात सोमवारी दुपारी सुरुवातीला पलूस तालुक्यातील माळवाडीत पूरग्रस्त भागाची पाहणी करून निवारा केंद्रातील नागरिकांशी संवाद साधला. भिलवडीत पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मिरज तालुक्यातील कवलापूर येथे निवारा केंद्रास तसेच सांगलीतील पूरग्रस्त भागास, पूरग्रस्त निवारा केंद्रास भेट दिली. 

एनडीआरएफच्या धर्तीवर तुकडीचा विचारएनडीआरएफच्या धर्तीवर एक तुकडी करून तिचे केंद्र कराड येथे करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा अडीचपट जादाची मदत करण्यात आली. तशीच मदत आताही पूरग्रस्तांना करण्यात येईल. राज्य सरकार जबाबदारी घेईलच; पण केंद्र सरकारनेही जबाबदारी घ्यावी, असे पवार म्हणाले.

कोल्हापूरचा विळखा सैलकोल्हापुरातील महापुराचा विळखा सैल झाला असून, मदतकार्याला वेग आला आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाऊस थांबल्याने पूर ओसरेल तसे घराघरात, दुकानात स्वच्छतेची कामेही युद्धपातळीवर सुरु आहेत. सोमवारी पाऊस पूर्णपणे उघडला व कडकडीत ऊन पडले होते. 

 

टॅग्स :floodपूरSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूरMaharashtraमहाराष्ट्र