शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, विदर्भात पूरस्थिती; शेकडो गावांचा संपर्क तुटला, शेतशिवारात पाणीच पाणी, पिकांचा चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 07:07 IST

Flood situation in Marathwada & Vidarbha: मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील जिल्ह्यांना सोमवारीही अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला.

 मुंबई -  मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील जिल्ह्यांना सोमवारीही अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला. नदी-नाल्याकाठच्या गावांना फटका बसला. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेकडो गावांचा संपर्क तुटला. पिकांचाही चिखल झाला.  

नांदेड, परभणी व हिंगोलीमधील १६ प्रकल्पांमधून विसर्ग करण्यात येत असल्याने गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अकोला जिल्ह्यांतील शिवारं जलमय झाली आहेत.  नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफचे पथक तैनात केले आहे. जायकवाडी धरण ८८ टक्के भरले आहे. या अतिवृष्टीत ४ लोकांना प्राण गमवावे लागले असून, १७ जण जखमी झाले आहेत. ८८ जनावरांचा मृत्यू झाला असून, १६० कच्च्या घरांची पडझड झाली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.    

बैल धुताना बुडून मृत्यू   बुलढाणा : पोळ्यानिमित्त बैल धुताना बुडून जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला. देवधाबा (ता.मलकापूर) येथे प्रकाश शिवदे, हरणखेड (मलकापूर) येथे गोपाळ वांगेकर, रोहीणखेड (मोताळा) येथे महेंद्र चव्हाण, डोणगाव (ता.मेहकर) येथे आकाश उर्फ अक्षय नंदेकर याचा मृत्यू झाला. जळगावात वाघझिरा (ता. यावल) येथे एकाचा मृत्यू झाला.

पुरात वाहून गेल्याने मृत्यू जालना : बानेगाव (ता.घनसावंगी) येथे शिवाजी शिंदे (४८) यांचा बुडून मृत्यू.चंद्रपूर : मराठागुडा ते शेडवाहीदरम्यान (ता.जिवती) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तेलंगणातील युवकाचा मृत्यू. नांदेड : पासदगाव येथे पूल ओलांडण्याचा प्रयत्न करणारा युवक वाहून गेला. यवतमाळ : आकपुरी नाल्याच्या पुरात सुरेश गवते (४०) हे वाहून गेले.   अकोला : चान्नी  (ता.पातूर) येथील रुक्मिणी पवार (४०) ही महिला वाहून गेली. सिंधुदुर्ग : माडखोल धवडकी येथे नोव्हेल फेलिक्स (३०, रा. मुंबई) या ख्रिस्ती धर्मगुरूचा नदीत बुडून मृत्यू.

३९ जण बचावले हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात चार गावांतून ३९ जणांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढले.

आजचा अंदाज काय? संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव याशिवाय सातारा आणि पुणे जिल्ह्याला मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

टॅग्स :floodपूरMaharashtraमहाराष्ट्रMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भweatherहवामान