गोंदिया: सडक-अर्जुनी तालुक्याच्या बाम्हणी सडक येथील अथर्व राजेश उके (५) हा चिमुकला मित्रांसोबत आंबे खाण्यासाठी शेतात गेला असतांना त्याला करंट लागून त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१५) दुपारी घडली. बाम्हणी सडक येथील मधुबाई सिडामे यांच्या शेतातील विद्युत खांबावरील तार तुटून दामोदर तागडे यांच्या शेतापर्यंत त्या वाहिन्या विखरून पडल्या होत्या. अथर्व मित्रांसोबत आंबे खाण्यासाठी शेतात गेला असताना दामोदर तागडे यांच्या शेतात करंट लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता माधव तरोणे यांनी केली आहे.
करंट लागून पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 17:36 IST