शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

पदवी प्राप्त करण्यासाठी आता पाच वर्षांची मर्यादा

By admin | Updated: October 23, 2015 01:58 IST

पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मर्यादा घातल्या आहेत. विद्यार्थ्यांना आता ठरावीक कालावधीतच पदवी प्राप्त करावी लागणार आहे.

पुणे : पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मर्यादा घातल्या आहेत. विद्यार्थ्यांना आता ठरावीक कालावधीतच पदवी प्राप्त करावी लागणार आहे. पदवीच्या कालावधीपेक्षा अधिकची केवळ दोन वर्षे दिली जातील. अन्यथा पुन्हा पहिल्या वर्षाला प्रवेश घ्यावा लागेल. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काही विद्यापीठांकडून बराच कालावधी दिला जातो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे तीन वर्षांच्या पारंपरिक अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त करण्यासाठी सहा वर्षांची मुदत दिली जात होती, तर चार वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आठ वर्षे कालावधी दिला जात होता. अभ्यासक्रमांच्या कालावधीत एकसंधता यावी यासाठी आता विद्यापीठांच्या नियमित अभ्यासक्रमाच्या कालावधीव्यतिरिक्त पदवी प्राप्त करण्यासाठी केवळ दोन वर्षांचा अधिकचा कालावधी दिला जाणार आहे.राज्यातील सर्व विद्यापीठांना यूजीसीने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे नोकरी किंवा कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मिळेल त्या वेळेत अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वर्षांचे बंधन पाळावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने निश्चित केलेल्या कालावधीत पदवी प्राप्त करणे शक्य होणार नाही, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने संबंधित अभ्यासक्रमाचे सर्व विषय घेऊन परीक्षा द्यावी लागेल. परिणामी पुढील काळात बी. ए., बी.कॉम., बी.एस्सी. हे तीन वर्षांचे पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांतच पूर्ण करावे लागतील. अभियांत्रिकीसारखी पदवी सहा वर्षांत पूर्ण करावी लागेल. अपवादात्मक स्थितीत विद्यापीठएखाद्या विद्यार्थ्याला एक वर्षाचा कालावधी वाढवून देऊ शकेल, अशीही तरतूद आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. (प्रतिनिधी) विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या कालावधीबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सर्वच विद्यापीठांना परीक्षांच्या कालावधीसंदर्भात निश्चित धोरण ठरवावे लागणार आहे. - डॉ. अशोक चव्हाण,परीक्षा नियंत्रक,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ