लंडनमधील 'महाराष्ट्र भवन'साठी पाच कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 07:51 IST2025-08-27T07:50:14+5:302025-08-27T07:51:05+5:30
Maharashtra Bhavan: लंडन येथील महाराष्ट्र मंडळ संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करुन तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

लंडनमधील 'महाराष्ट्र भवन'साठी पाच कोटींचा निधी
मुंबई - लंडनमधील मराठीजनांना आपल्या हक्काचे आणि स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक भवन मिळावे, या अनेक वर्षांच्या मागणीला आता मूर्त स्वरूप मिळणार आहे. लंडन
येथील महाराष्ट्र मंडळ संस्थेला लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची इमारत खरेदी करुन तेथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
लंडन येथील महाराष्ट्र मंडळ ही भारताबाहेरील सर्वांत जुन्या मराठी संस्थांपैकी एक आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधींचे वैयक्तिक सचिव डॉ. एन. सी. केळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. लंडन आणि आसपासच्या परिसरातील मराठी बांधवांना सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. गेल्या ९३ वर्षांपासून हे मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे.