शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पुण्यात पहिले स्वतंत्र '' सायबर सिक्युरिटी '' कॉलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 11:22 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पहिले ‘सायबर सिक्युरिटी’ कॉलेज सुरू होणार

ठळक मुद्देविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठकअंतिम मंजुरीसाठी १३ नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव शासनाकडे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पहिले ‘सायबर सिक्युरिटी’ कॉलेज सुरू होणार असून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने या प्रस्तावास मान्यता दिली आहे. तसेच सायबर सिक्युरिटीसह इतर १३ नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव विद्यापीठाने अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांच्या संख्येत १३ नव्या महाविद्यालयांची भर पडणार आहे.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत नवीन महाविद्यालयाच्या प्रस्तावावर चर्चा केली. विद्यापीठाच्या पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यामध्ये नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी बृहत् आराखड्यानुसार प्रस्ताव मागविले होते. प्राप्त प्रस्तावांची विद्यापीठातर्फे छाननी केली. त्यानंतर प्रस्तावावर चर्चा करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यात ९ प्रस्ताव, नाशिक जिल्ह्यात  ३ तर इतर १ अशी १३ महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने मंजूर केला आहे. विद्यापीठाकडे पुण्यातील ३ शैक्षणिक संस्थांनी ‘सायबर सिक्युरिटी’बाबत प्रस्ताव पाठविले. त्यातील २ शासनाच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविले आहेत.

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिकcyber crimeसायबर क्राइमcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकर