मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 10:58 IST2021-01-09T09:29:17+5:302021-01-09T10:58:55+5:30
the fire incident at Bhandara District General Hospital : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
याचबरोबर, या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
Ex-gratia of Rs 5 lakhs each to be provided to the kin of the deceased in the fire incident at Bhandara District General Hospital: Rajesh Tope, Health Minister, Maharashtra pic.twitter.com/Qnsct8zeEj
— ANI (@ANI) January 9, 2021
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे.