Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 00:25 IST2025-07-29T00:23:59+5:302025-07-29T00:25:55+5:30
Badlapur Fire: माणकीवली एमआयडीसीतील एव्हीए कंपनीत ही घटना घडली.

Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीत बॉयलरला आग लागल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. यावेळी बदलापूर नगरपरिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.
बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत एव्हीए केमिकल नावाची कंपनी आहे. या कंपनीत रासायनिक उत्पादन केले जाते. या कंपनीतील बॉयलरला सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच बदलापूर नगरपरिषद आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र या आगीमुळे केमिकल कंपन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आग लागलेल्या कंपनीकडे फायर एनओसी सुद्धा नसल्याची चर्चा असून त्यामुळे अशा निष्काळजीपणा करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.