शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

सोयाबीन खरेदी  विनाअट करा; सरकारचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 1:14 AM

अटी गुंडाळून सोयाबीनची तत्काळ प्रतिक्विंटल ३,0५0 रुपये आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे ‘नाफेड’च्या अधिकार्‍यांना दिले. सोयाबीनमधील आद्र्रता १२ ऐवजी १४ टक्के असली, तरी खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

ठळक मुद्देआद्र्रतेचे नियमही शिथिलमी सांगतोय, तोच अध्यादेश - सदाभाऊ खोत

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अटी गुंडाळून सोयाबीनची तत्काळ प्रतिक्विंटल ३,0५0 रुपये आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे ‘नाफेड’च्या अधिकार्‍यांना दिले. सोयाबीनमधील आद्र्रता १२ ऐवजी १४ टक्के असली, तरी खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. खोत यांनी रविवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन खरेदी केंद्रास भेट देऊन आढावा घेतला. उत्पादनाच्या तुलनेत फारच कमी खरेदी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने ते संतापले होते. दोन ठिकाणी सोयाबीनची तपासणी होत असल्याने शेतकर्‍यांची कुचंबणा होत असल्याचे बाजार समिती पदाधिकार्‍यांनी निदर्शनास आणून दिले. खरेदी केंद्र व वेअर हाउसऐवजी केवळ खरेदीच्या ठिकाणी तपासणी करा. सात-बारावरील नोंद न पाहता, शेतकरी असल्याचा दाखला, आधार कार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्स पाहून खरेदी करा, असे त्यांनी स्पष्ट केले.अटी गुंडाळून ठेवा, सोयाबीनमध्ये घाण असेल, तर त्याला चाळण द्या आणि खरेदी करा. पहिल्यांदा चांगल्या मालाची खरेदी होऊ दे, नंतर दुय्यम प्रतीचेही बघू, असेही त्यांनी सांगितले.  

मी सांगतोय, तोच अध्यादेश!सगळ्य़ा अटी बाजूला ठेवून सोमवारपासून खरेदी करा. कोणत्याही परिस्थितीत खरेदी वाढली पाहिजे. हयगय करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल. सुधारित अध्यादेशाची वाट पाहू नका; मी सांगतो तोच अध्यादेश, असे ते म्हणाले.

प्रत्येकी १0 लाख क्विंटल खरेदी : केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी १0 दहा लाख क्विंटल खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीSadabhau Khotसदाभाउ खोत