शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

"मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड...", बचत गटाच्या महिलांचा कॉल व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 11:00 PM

मुक्ताईनगरबरोबरच जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

जळगाव :   मुक्ताईनगरमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तापी नदीवरील पुलाच्या शुभारंभाचा कार्यक्रम पाडला. मात्र या कार्यक्रमाला महिला बचत गटातील महिला उपस्थित राहिल्या नसल्यास त्यांना ५० रुपयांचा दंड भरण्याची सक्ती करण्यात आली. याबाबतचा बचत गटाच्या अध्यक्षा आणि कार्यकर्त्या ज्योत्स्ना महाजन यांनी फोनवरून महिला बचत गटाच्या महिलांना मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी धमकावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी ज्योत्स्ना महाजन आणि दुसऱ्या महिलेचे कॉल रेकॉर्डिंग ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुक्ताईनगरबरोबरच जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. 

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने ट्वीट करत म्हटले की, आज मुक्ताईनगर तालुक्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानिमित्त भूमिपूजनासाठी येत आहेत. महिला बचत गटाच्या महिला भगिनींनी माझ्याशी संपर्क साधून मला असे सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जात आहे. आम्ही जर उपस्थित नाही राहिलो तर, आमच्याकडून 50 रुपये दंड आकारले जातील, बचत गटातून काढून टाकण्यात येईल आणि कारवाई केली जाईल. असे बचत गटाच्या अध्यक्षा तसेच आमदारांच्या कार्यकर्त्या ज्योत्स्ना महाजन यांनी सांगितले आहे.

महिला बचत गटाच्या भगिनींनी मला काही स्क्रीन शॉट आणि रेकॉर्डिंग ऐकवलेल्या आहेत. महिला भगिनींना दमदाटी करण्याचा ज्या ज्योत्स्ना महाजन प्रयत्न करत आहेत, त्यांना मी फोन करून शहानिशा केली. त्यावर त्यांनी त्याची कबुली देखील दिलेली आहे. आमची सरकारला एकच विनंती आहे की, ‘या महिला बचत गटात ज्या भगिनी काम करतात त्यांची परिस्थिती बिकट आहे. आज त्यांना हाताला काम पाहिजे. आज कोणाची मुले, सासू-सासरे आजारी असू शकतात. कोणाला शेतात जायचे असेल. दिवसाचा रोज पाडून त्यांना जर कार्यक्रमाला जाणे शक्य नसेल तर त्यांच्यावर जबरदस्ती कशासाठी केली जात आहे?’

मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, ‘आपल्या कार्यक्रमाला ज्यांना मनाने यायचे आहे. त्यांना यायला कोणीही थांबवत नाही. आम्ही विकासाच्या बाजूने आहोतच. मुख्यमंत्र्यांचे स्वागतच आहे मुक्ताईनगर तालुक्यात, पण माता भगिनींना त्रास देऊन किंवा त्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाला आलंच पाहिजे. ही जी भूमिका आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे, त्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा असल्याचे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या एक्स हँडलवर दोन महिलांमधलं संभाषणही पोस्ट करण्यात आले आहे. मीनाक्षी आणि ज्योत्स्ना ताई अशा दोन महिलांचे हे संभाषण आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRohini Khadseरोहिणी खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस