पेन्शनमध्ये अखेर वाढ; वृद्धांना मिळाला आधार, १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 01:12 PM2024-01-17T13:12:48+5:302024-01-17T13:12:56+5:30

विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावेळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता दिली होती.

Finally increase in pension; Senior citizens get Aadhaar, increase to be effective from 1 January 2024 | पेन्शनमध्ये अखेर वाढ; वृद्धांना मिळाला आधार, १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार वाढ

पेन्शनमध्ये अखेर वाढ; वृद्धांना मिळाला आधार, १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार वाढ

मुंबई : राज्य सरकारने वयाची ८० वर्षे पार केलेल्या सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन वाढविण्यात येत असल्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावेळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता दिली होती.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, १ जानेवारी २०२४ पासून ही वाढ लागू होणार आहे. तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम देय नसेल. याचा अर्थ निवृत्तिवेतनातील वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही.  

ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू आहे असे राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी, शासन मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही वाढ लागू राहील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

Web Title: Finally increase in pension; Senior citizens get Aadhaar, increase to be effective from 1 January 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.