शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर उद्या आणि परवा अंतिम सुनावणी', राहुल नार्वेकरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 18:13 IST

'उद्धव ठाकरेंचे माझ्यावर विषेश प्रेम आहे.'

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीपर्यंत द्या, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना दिले आहेत. याबाबत नार्वेकरांनी आज महत्वाची माहिती दिली.

माध्यमांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याचिकेसंदर्भात आजची सुनावणी पूर्ण झाली असून, आम्ही आजच आम्ही दोन्ही बाजुचा एव्हिडेन्स क्लोज केलेला आहे. उद्या आणि परवा यावर अंतिम सुनावणी होईल आणि 31 तारखेला हे प्रकरण क्लोज होईल. मला खात्री आहे 15 फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जारी केला जाईल,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

'उद्धव ठाकरेंचे माझ्यावर विषेश प्रेम'देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यावरुन विरोधक सत्ताधारी भाजपावर निशाणा साधत आहेत. दरम्यान, नार्वेकरांची निवड हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 

लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

याबाबत बोलताना नार्वेकर म्हणाले की, अशा मोठ्या पदावर राज्यातील एखादा व्यक्तीीची निवड झाल्यावर, राज्यासाठी हा मोठा क्षण असतो. पण, उद्धव ठाकरेंचा राज्याची अस्मिता आणि राज्यातील बांधवाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा वेगळा अंदाज असेल. त्यामुळे मी त्यांच्या शुभेच्छांसाठी त्यांना धन्यवाद करतो. त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे,' असा टोला नार्वेकरांनी लगावला.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे