शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

By admin | Updated: June 4, 2015 04:41 IST

मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला फ्लॅट नाकारणाऱ्या बिल्डर व त्याच्या कर्मचाऱ्याविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

मुंबई : मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबाला फ्लॅट नाकारणाऱ्या बिल्डर व त्याच्या कर्मचाऱ्याविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. राजेश मेहता (४७) असे बिल्डरचे नाव आहे. धर्म, जात, भाषा पाहून घटनेने दिलेल्या अधिकारांपासून एखाद्याला वंचित ठेवणे, असा गुन्हा मेहतांविरोधात दाखल केल्याची माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद खेतले यांनी ‘लोकमत’ला दिली.मेहता यांची श्रीनाथजी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. मालाड पश्चिमेकडे मेहता यांनी इमारत उभारली आहे. याच परिसरात राहणारे वैभव रहाटे ४ मे रोजी आपल्या मित्रासह मेहता यांच्या साइट आॅफीसमध्ये गेले. रहाटे आपल्या बहिणीसाठी घराच्या शोधात होते. साइट आॅफिसमध्ये त्यांची भेट वरुण मेहता या कर्मचाऱ्याशी झाली. रहाटे यांनी वरुणकडे फ्लॅटचा भाव आणि इतर चौकशी सुरू केली. तेव्हा रहाटे यांनी घर देता येणार नाही, असे बिल्डरच्या कर्मचाऱ्याने सांगितले. त्यामुळे संतापलेल्या रहाटे यांनी तत्काळ मालाड पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. मात्र मालाड पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा रहाटे यांनी केला होता. पुढे हा प्रश्न मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी उचलला. गुन्हा दाखल न झाल्यास गुरुवारी पुन्हा आंदोलन कण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर मालाड पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेऊन बिल्डर मेहता व त्यांचा कर्मचारी वरुण यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला.